१७६ पुराणनिरीक्षण. या पुस्तकास जोडलेला आहे. या पुस्तकापासून साधारण वाचकांस पुष्कळ नवी माहिती व पुराणशोधकांस विचार करण्यास नव्या गोष्टी मिळून, भारतीय इतिहास व कालगणना यांची चर्चा मजहून अधिक विद्वान् लोकांकडूनही होऊं लागली म्हणजे माझी अल्पशी कामगिरी संपली असें मी समजतों. या उत्तरार्धीत पौराणिक कालगणना, पौराणिक इतिहास, पौराणिक भूगोल व पूर्वकल्पाचा इतिहास अशीं चार प्रकरणें आहेत. पौराणिक कालगणनेविषय वर लिहिलेलेच आहे. पौराणिक काल गणनेच्या धोरणानेंच पौराणिक इतिहासाचा उलगडा चौथ्या प्रकरणांत केलेला आहे. त्यांत इक्ष्वाकूपासून, निमीपासून व बुधापासून अनुक्रमें सूर्य- वंश, जनकवंश व चंद्रवंश हे कसे सुरू झाले, व ते भारतीय युद्धापर्यंत व पुढेही गौतमबुद्ध, महानंद व चंद्रगुत यांचे वेळेपर्यंत कसे चालू होते, हैं दाखविलेले आहे. कालगणनेशिवाय इतिहास अंधळा असल्यामुळे तिसऱ्या प्रकरणांत इतक्या परिश्रमानें प्रथम पौराणिक कालगणनापद्धति ठरवावी लागली आहे. मग तिच्या प्रकाशानें भारतीय इतिहास इ० पू० २६०० किंबहुना इ० पू० ३१०२ पर्यंत संगतवारपणें नेलेला आहे. नंतर पांचव्या प्रकरणांत पौराणिक भूगोलाचा थोडासा विचार करून, सहाव्या प्रकरणांत पूर्वकल्पांतील गोष्टींवर ओझरता प्रकाश पाडण्याचा यत्न केलेला आहे. ग्रंथकर्ता.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१९१
Appearance