Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. १७३ गुप्तीपर्यंत ) ( १५३ x २० = ) ३०६० वर्षे सुमारें होतात. स्वायं- भुवमनूपासून हल्लींचा कल्प सुरू होतो. इ० पू० ३१०२ हा जो काळ आपण कलीचा आरंभ म्हणून धरितों तो खरोखर कल्पाचा आरंभ आहे. भारतीय युद्धापासून चंद्रगुप्ताच्या वेळेपर्यंत ३४-३५ पिढ्या आहेत, तर त्यांस २७०० वर्षांचा काळ दिला तर प्रत्येक पिढीस सुमारें ८० वर्षे पडतात; शिवाय, भारतीय युद्धापूर्वीच्या ११९-१२० पिढ्यांस याच हिशे- बानें द्वापर, त्रेता व कृत या युगांची बेरीज मिळून ( ८६४०००+ १२९६००० + १७२८००० = ) ३८८८००० वर्षे पडत असल्या- मुळें प्रत्येक पिढीस (- = ) ३२४०० वर्षे द्यावीं लाग- तात ! भारतीय युद्धानंतरच्या पिढ्यांस कदाचित् कोणी एक वेळ ८० वर्ष कबूल करतील ! पण कृत, लेता व द्वापर या युगांतील प्रत्येक पिढीस ३२४०० वर्षे देणें, हें मात्र जुन्या किंवा नव्या कोणत्याही मताच्या मंड- ळीस मान्य होणार नाहीं, असे मला वाटतें ! मूळची युगमन्वंतरपद्धति फार साधी असावी, असे मला तरी या पुस्तकांत गोळा केलेल्या प्रमाणां- वरून वाटतें; कोणत्याही स्थितीत, व वेदांत देखील जर १०० वर्षांच्यावर मनुष्याचें आयुष्य सांगितलेलें नाहीं, तर उगाच अवाढव्य युगांस चिक टून बसण्यांत मतलब काय ? दशरथ ६०००० वर्षे राज्य करीत होता, रामानें ११००० वर्षे राज्य केलें, विश्वामित्राने १० हजार वर्षे तप केलें, रामराज्याचे वेळीं ब्राह्मणाचा मुलगा मेला तो ५ हजार वर्षीचा होता, यांतील सर्व ' हजार ' निरर्थक आहेत, असे मला तरी वाटतें. याचें कारण असें कीं, पद्मपुराणांत उत्तरकांडांतील कथा आलेली आहे तेथें, रामराज्याच्या वेळीं जो मुलगा मेला, त्याचें वय पांच ( ५ ) वर्षांचें होतें, असें स्पष्ट दिलेलें आहे; आनंदरामायणांत पूर्वकाळच्या युगांला ३८८८००० १२०