Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ ३ माहेश्वरखंड- वैष्णवखंड- ब्रह्मखंड- काशीखंड- रेवाखंड- तापीखंड- प्रकरण दुसरें, स्कंदमाहात्म्य. सृष्टिवर्णन ( संक्षिप्त ). काशीमाहात्म्य. उज्जयिनीकथा. ... कल्पपूजा, विश्वकथा व तापीमाहात्म्य. १३१ प्रभासखंड- प्रभासमाहात्म्य. या सर्व खंडांतून मिळून १२ हजारांवर विभाग आहेत ! ! ! याच सप्तमहाखंडात्मक विभागाची सूची नारदपुराणानें दिलेली आहे; ती लांबलचक असल्यामुळे येथे दिलेली नाहीं; ती मुळांतूनच पहावी. वरील प्रमाणांवरून पहातां स्कंदपुराणाचे दोन प्रकारचे विभाग अस लेले दिसून येतात; एक, सहा संहिता व त्या सर्व संहितांत मिळून ५० पन्नास खंड, असा पहिला विभाग; व दुसरा, केवळ ७ महाखंडात्मक विभाग. दोहोंची ग्रंथसंख्या ८१ हजार किंवा ८११०० इतकीच आहे. पुढें मात्र ८१ हजारांची श्लोकसंख्या एक लक्षाची झाली; माधवाचार्यांनी सूत संहितेवर टीका लिहिली, तेव्हां तींत स्कंदपुराण एकलक्षात्मक ग्रंथ असल्याबद्दलचा समज दाखविणारा श्लोक होता. यावरून, १४ व्या शतकांत, हें पुराण एक लक्षाचें आहे, असा समज झालेला होता हैं आढळून येईल. शिवाय यावरून दुसरें एक सिद्ध होतें कीं, नारदसूची स्कंदपुराणाचा षट्संहितात्मक व (त्यांतून ) पंचाशत्खंडात्मक विभाग मोडून त्या जागी केवळ सप्तखंडात्मक विभाग उत्पन्न झाल्यानंतरची आहे; व हा विभाग हैं पुराण ८१ हजारांचें आहे, अशी समज असतांच झालेला

  • तो आनंदाश्रमांत छापलेल्या सूतसंहितेवरून वर दिलेला आहे..