Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण, या श्लोकसंख्येप्रमाणें ८१ हजार संख्या भरते; पण आनंदाश्रमांत छापलेल्या सूतसंहितेच्या प्रारंभ सनत्कुमारसंहितेची ग्रंथसंख्या ५५ हजार दिली आहे, त्यामुळे एकंदर श्लोकसंख्या एक लक्षाची होते; पण स्कंद- पुराण ८१ हजारांचें आहे, हीच जुनी ( मात्स्य व भागवताची ) परंपरा होय; यावरून पुढें स्कंदपुराण ८१ हजारांवरून एक लक्षपर्यंत वाढलें हैं कळून येईल, व एक लक्ष स्कंदाचा उल्लेख हल्लीच्या भविष्यपुराणाच्या प्रारंभी आहे. ( भविष्यपुराणनिरीक्षण पहा. ) स्कंदपुराणाच्या प्रचलित प्रभासखंडाच्या मतानेंही हें पुराण ८१ हजार एकशे लोकांचें आहे; पहाः -- स्कांदं तु सप्तधा भिन्नं वेदव्यासेन धीमता । एकाशीति सहस्राणि शतं चैकं च संख्यया ॥ तस्यादिमो विभागस्तु स्कंदमाहात्म्यसंयुतः । माहेश्वरसमाख्यातो द्वितीयो वैष्णवस्य च तृतीयो ब्रह्मणः प्रोक्तः सृष्टिसंक्षेपसूचकः । काशीमाहात्म्यसंयुक्तश्चतुर्थः परिपठ्यते || रेवाया: पंचमो भाग उज्जयिन्याः प्रकीर्तितः । षष्ठः कल्पार्चनं विश्वं तापीमाहात्म्यसूचनः । सप्तमोऽथ विभागोऽयं स्मृतः प्राभासिको द्विजाः । सर्वे द्वादशसाहस्रं विभागाः साधिकाः स्मृताः ॥ प्रभासखंड, दुसरा अध्याय. यांत श्लोकसंख्या ८११०० असून शिवाय याचे सात खंड सांगितले आहेत. ते असे:--