Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणानिरीक्षण. आहे. यावरून हा दुसरा विभाग व त्यावरून झालेली नारदसूची हीं १४ व्या शतकापूर्वीच तयार झालेली आहेत हे सिद्ध होतें. षट्संहिता व तदंतर्गत पंचाशत्खंड अशा विभागपद्धतींत सूतसंहिता ही दुसरी संहिता असून, त्या संहितेंत खालीं दिल्याप्रमाणें खंडसंख्या व श्लोक- संख्या दिलेली आहे. खंड शिवमाहात्म्यखंड ज्ञानयोगखंड १ २ अध्याय १३ २० ९ मुक्तिखंड यज्ञवैभवखंड ७०० ७३७ ५६३ ४००० ४ ४२+१ ४ ६००० हल्लीं स्कंदपुराणांतर्गत म्हणून मिळणाऱ्या संहिता व खंड यांची लोकसंख्या एकत्र करण्यानें ती एक लक्षाहूनही अधिक भरते असें पं. ज्वालाप्रसाद यांचे मत आहे ! ! हल्लीं सनत्कुमार, सूत, शांकर, व सौर या संहिता मिळालेल्या आहेत; पैकीं शांकरसंहितेचे कांहीं भाग मात्र मिळतात. तिसरी जी शांकरसंहिता तिचे अनेक खंड आहेत; त्या सर्वात शिवरहस्यखंडच श्रेष्ठ आहे; त्या खंडांत म्हटलेलें आहे कीं: -- ... श्लोक तत्र या संहिता प्रोक्ता शांकरी वेदसंमिता | त्रिंशत्सहस्रैर्ग्रथानां विस्तरेण सुविस्तृता || आदौ शिवरहस्याख्यं खंडमद्य वदामि वः । तत्त्रयोदशसाहस्रैः सप्तकांडैरलंकृतम् ॥ पूर्वः संभवकांडाख्यो द्वितीयस्त्वासुरः स्मृतः । माहेंद्रस्तु तृतीयो हि युद्धकांडस्ततः परम् ॥