Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१,१८ पुराणानिरीक्षण, १- ( १ ) सुमंतूनें शतानीकास भविष्यत्पुराणाच्या ब्राहापर्वाच्या दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी त्या पुराणांत कोणकोणती पवें आहेत, हे सांगितलें आहे; त्यांत ( १ ) ब्राह्मपर्व, ( २ ) वैष्णवपर्व, ( ३ ) शैवपर्व, (४) त्वाष्ट्र पर्व, व ( ५ ) प्रतिसर्गपर्व, हीं पांच पवें आहेत; त्यांत उत्तर- पर्वाचें नांवही नाहीं. हल्ली भविष्यत्पुराणांत ( १ ) ब्राह्मपर्व, ( २ ) मध्यमपर्व, ( ३ ) प्रतिसर्गपर्व व ( ४ ) उत्तरपर्व अशीं चार पर्व मिळतात. सुमंतूचें तिसरें शैवपर्व कदाचित् मध्यमपर्व म्हणतां येईल. सुमंतूच्या वेळचे दुसरें व चवथें पर्व कोठें उपलब्ध असल्याप्रमाणे दिसत नाहीं. प्रतिसर्गपर्व हल्लींच्या पुराणाप्रमाणे तिसरें असून उत्तरपर्व चौथे आहे. चार पर्वात दुसऱ्या पर्वाला मध्यमपर्व म्हणणें कसें शोभेल ? तेव्हां सुमंतूच्या वेळच्या पांच पर्वोपैकी हल्ली उपलब्ध असलेल्या तीन पर्वोमध्यें मध्यमपर्व हैं मध्यम ठरतें. म्हणजे भविष्योत्तरपुराण स्वतंत्र धरावें लागतें. ( २ ) मागच्या सर्व पुराणांत भविष्यत्पुराणाची संख्या १४५०० सांगितली आहे. एकंदर चारी पर्वोची संख्या हल्ली ९०३६+३११४+ ६२२८+८५९२=२६९७० इतकी आहे. म्हणजे स्थूलमानाने सध्यां २७,००० श्लोक यांत आहेत असे म्हटले तरी चालेल. भविष्यत्पुराण १४३ हजारांवरून २७ हजारापर्यंत वाढले असे मानण्यापेक्षां, भविष्योत्तराचीं ८५९२ श्लोकसंख्या (स्वतंत्र ग्रंथाची म्हणून वेगळी करून ) बाकीच्याची बेरीज केली तर ती १८,३७८ इतकी येते. म्हणजे वर पुराणांनी सांगि- तली आहे त्यापेक्षां जवळ जवळ स्थूलमानानें ४००० श्लोक हल्लीं जास्त आढळतात; व ते कां आढळतात हे मागें भविष्यांतील प्रतिसर्गपर्वावरूनच कळून येण्यासारखे आहे. हरिवंशासारखा ग्रंथ (भारताच्या आदिपवत त्याची संख्या १२०० •● सांगितली असतां) जर सध्यां १६००० वर आढळतो, तर भवि- ष्यत्पुराण चार हजारांनी वाढले असावें, असे मानण्यास हरकत दिसत नाहीं. व्यासांनी सर्व ग्रंथ लिहिले तसेच सध्यां कांहीं मिळणे शक्य नाहीं; भारत-