Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. ११९ देखील तसेंच राहिले नाहीं; मग बाकीच्या पुराणांची काय कथा ? पण चौदा साडे चौदा हजारांचे जवळ जवळ दुप्पट श्लोक होतील, असे मानण्या- पेक्षां भविष्योत्तरपुराण हा स्वतंत्र ग्रंथ मानणें मला तरी बरें दिसतें. ( ३ ) अपरार्कानें आपल्या याज्ञवल्क्यस्मृतीवरील टीकेंत भविष्यत्पुरा- गांतील व भविष्योत्तरांतील असे भिन्न भिन्न उतारे दिले आहेत. ( ४ ) ब्राह्मपर्वाच्या प्रारंभी सुमंतु तें पुराण भविष्यपुराण ) शतानीकास सांगत आहे; पण भविष्योत्तरपुराणांत कथारंभ नवीनच असून तो श्रीकृष्ण-युधिष्ठिर-संवादरूप आहे; शिवाय त्याचा स्वतंत्र ग्रंथासारखाच आरंभ असून अखेरही आहे. युधिष्ठिर युद्धानंतर अभिषिक्त झाल्यावर जेव्हां अगर्दी विषादयुक्त झाला तेव्हां श्रीकृष्णांनी त्यास अनेक धर्म व व्रतें कथन केलीं, असें याच्या प्रस्तावनेंत म्हटले आहे. ( ५ ) स्वतः ग्रंथांतही प्रमाणें आढळतात ती अशी:- भविष्योत्तराच्या प्रारंभी ' हें भविष्यत्पुराणाचें उत्तरपर्व मी सांगतों' असें कृष्णानें म्हटलें नसून, असें म्हटलें आहे :- " याज्ञवल्क्येन मुनिना भविष्यद्भास्वतां पतिः । पृष्टो यदुत्तरं प्रादादृषिभ्यस्तन्मया श्रुतम् ॥ * * भविष्योत्तर मेत्तत्ते कथयामि युधिष्ठिरम् ॥ १. ६ व ७ ॥ ” शेवटीं अ. २०७ मध्यें श्री- कृष्णानें युधिष्ठिरास म्हटले आहे कीं:-" व्रतं दानमथो राजँस्तव धर्माः प्रकाशिताः ॥ धर्ममूलं यतश्चेदं तस्माद्धर्मपरो भव ॥ १ ॥ ** भविष्यो- त्तरमेतत्ते कथितं पांडुनंदन | सदाचारवतां पुंसां व्रतदानसमुच्चयः ॥ ४ ॥

  • * ख्यातं भविष्योत्तरनामधेयं । मया पुराणं तव सौहृदेन ॥ १० ॥
  • * ॥ यद्याज्ञवल्क्यमुनिना भगवान् भविष्यत् । ( वसिष्ठः ) पृष्ट: किलो-

त्तरमुवाच बहुप्रकारम् । कृष्णेन पांडुतनयस्य च यत्प्रदिष्टं । व्यासेन तत्कृ तमहो मुनिपुंगवेन ॥ ॥ १४ ॥ " यावरून हे दुसऱ्याच एक परंपरेचें ( सौरधर्मोत्तर, शिवधर्मोत्तर, यांजसारखें ) स्वतंत्र पुराण असून त्यांत