Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. हैं लिहून आज ९० वर्षे होत आली. सध्यांचे स्वरूपच तेव्हांही या पुराणांचें असले पाहिजे. ११७ ( २ ) शके १५६६-७० चे दरम्यान श्रीसमर्थांनी तुकारामास आपलें चरित्र वर्णन केले आहे. ( रामदासस्वामींचे समग्र ग्रंथ, पृ. ७०५ पहा. ) त्यांत व्यासांच्या भविष्यपुराणाचा उल्लेख आहे, तो असाः - 'बौध्य नारायण होउनि बैसला | उपाय बोलिला व्यास मुनि ॥५॥ व्यास मुनि बोले भविष्यपुराण | जग उद्धरणें कलीमाजीं ॥ ६ ॥ कलीमाजीं गोदातीरीं पुण्यक्षेत्र । तेथें वातपुत्र अवतरे ॥ ७ ॥ अवतरे अभिधानीं रामदास | कृष्णातीरीं वास जगदुद्धारा ॥ ८ ॥ यांत स्वामी ' आपण होणार हैं भविष्य, भविष्यपुराणांत आहे' असे सांगत आहेत. स्वामींच्या वेळीं भविष्यपुराणाविषयीं काय कल्पना प्रचलित होत्या, याचें प्रतिबिंब वरील उताऱ्यांत आहे. ( ३ ) शके ९०० च्या सुमारच्या मुकुंदराजानें आपल्या विवेक- सिंधूच्या शेवटीं गुरुपरंपरा देतेवेळी आपल्या गुरूचें वर्णन भविष्योत्तर- पुराणी आहे असे म्हटले आहे. भविष्योत्तरपुराणम्* हैं पुराण पूर्वी स्वतंत्रपणे उपलब्ध असावें. पूर्वी यास स्वतंत्र पुराणचं समजत असत, याबद्दल बरीच प्रमाणे स्वतः त्या ग्रंथामध्यें व बाहेरही आढळतात. सध्या मात्र श्रीवेंकटेश्वरप्रेसमध्यें छापलेल्या भविष्यपुराणा- प्रमाण हैं भविष्यपुराणाचें उत्तरपर्व ऊर्फ चवथें पर्व मानिलें आहे; पण पूर्वी हा स्वतंत्र ग्रंथ असावा, याला मुख्यत्वेंकरून हीं कारणे आहेत:-

  • श्रीवेंकटेश्वरप्रेसमध्यें छापलेल्या भविष्यत्पुराणाचें चतुर्थ पर्व.

--