Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणानिरीक्षण. यावरून मूळच्या भविष्यपुराणापैकी फक्त मूळचें ब्राह्मपर्व मात्र थोड्याफार फरकानें उपलब्ध आहे, हें कळेल. बाकी सारी पवें नवीन तयार झालेली दिसतात; हें मथुरामाहात्म्यांतील खालील वाक्यावरूनही कळून येईल:- भविष्योत्तर पुराणाविषयों पुढें लिहिलेले आहे. शांबप्रख्याततीर्थे तु तत्रैवांतरधयित । ११६ शांबस्तु सह सूर्येण रथस्थेन दिवानिशम् । रविं पप्रच्छ धर्मात्मा पुराणं सूर्यभाषितम् । • भविष्यपुराणमिति ख्यातं कृत्वा पुनर्नवम् || प्रतिसची माहिती जरी जुनी व मूळ पुराणांतली नसली तरी तिचा इतिहासाला चांगला उपयोग होण्यासारखा आहे, हे मात्र खरें ! कलकत्ता संस्कृत कॉलेजांतील हस्तलिखित पोथ्यांत (Catalogue No 14, P. 53 ) एक भविष्यपुराणाची फार जुनी प्रत आहे. त्यांत १४ हजार श्लोक असून ब्राह्मपर्व, वैष्णवपर्व, शैवपर्व, सौरपर्व व उपसंहार असे पांच भाग आहेत. शिवाय, नारदपुराणांत सांगितल्याप्रमाणे यांत सर्व विषय आहेत. हें खरें भविष्यपुराण होय. भविष्यपुराणांत पूर्वी भविष्य सांगितले असल्याबद्दलचे मराठी कर्वीचे -समज एथें दोनतीन देतों :- - ( १ ) शके १७४१ मधील, धुंडिराजसुत नरहरि मालु हा आपल्या नवनाथभक्तिसारांत म्हणतो:- ( भक्तांनी कोठकोटें व कसे अवतार घ्यावेत हें पूर्वीच वर्णिले आहे, असे श्रीकृष्ण त्यांस म्हणत आहेत, असें अनुसंधान आहे. ) यावरि बोले प्रत्यक्ष नारायण । कीं तुम्हीं दीक्षेचे भविष्यपुराण | पूर्वीच कथिलें पराशरनंदनें । महामुनि व्यास तो ॥ अ० १ औंवी ५३ ॥