Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरे, कमी येतात. शिवाय, या मध्यमपर्वाच्या शेवटी दुसरा एक संख्यावाचक श्लोक आहे तो असाः- षट्पद्याधिकषट्पटू सहरूपरिसंख्यया । नवश्लोकशतोद्भूतं संपूर्ण स्याद्भविष्यकम् || ११३ " यावरून, लेखकाच्या मनासमोर भविष्यपुराण ५० हजारांचें आहे, ही कल्पना होती असे दिसतें. तो म्हणतो:-

" आतां ३६९०६ श्लोकांनीं

भविष्यपुराण पुरें होईल. या लेखकाच्या मतें मग ब्राह्मपर्व ५० हजार उणे ( ३६९०६+८९६०= ) ४५८६६ म्ह. ४१३४ श्लोकांचें असले पाहिजे ! तें हल्ला ९०३६ श्लोकांचें आहे ! ! ! बरें, ४१३४+८९६० मिळून १३०९४ ही संख्या या पर्वाअखेर व्हावयास पाहिजे होती, तीही ( ९०३६+३११४= ) १२१५० होत आहे. यावरून हा सर्व ब्रह्मघोटाळा काय आहे हे कळून येईल ! मध्यमपर्वात सुमंतुशतानिकांचा बिलकुल उल्लेख नसून प्रत्येक अध्यायाचे शेवटी भविष्यपुराण ५० हजारांचें आहे, असें ब्राह्मपर्वोतल्याप्रमाणेंही कोठें म्हटलेलें नाहीं ! मध्यमपर्व हें नांव प्रारंभी कोठें आलें नसले तरी तिसऱ्या पर्वासच कदाचित् मध्यमपर्व म्हणतां येईल ! पण मग दुसरें पर्व कोठे आहे ? भविष्यपुराण १४|१४३ हजार ग्रंथ आहे अशी खरोखर कल्पना असतेवेळी, हा ५० हजारांचा ग्रंथ आहे, ही मध्येंच कोठून कल्पना आली ? बापत एके ठाई म्हटलेले आहे कीं: -- सर्वाण्येव पुराणानि संज्ञेयानि नरर्षभ । द्वादशैव सहस्राणि प्रोक्तानीह मनीषिभिः ॥ १०४ ॥ पुनर्वृद्धिं गतानीह आख्यानैर्विविधैर्नृप ।