१.१.२ पुराणनिरीक्षण. एकही नव्हे हैं उघडच आहे; मग, ही स्वतंत्रच कोढील तरी भानगड असावी. याचें आपण निरीक्षण करूं. याच्या प्रारंभाच्या पहिल्या अध्यायांत म्हटलेले आहे की:- मध्यपर्व ह्यथो वक्ष्ये प्रतिष्ठादिविनिर्णयम् । धर्मप्रशंसनं चाल ब्राह्मणादिप्रशंसनम् || • आपद्धर्मस्य कथनं विद्यामाहात्म्यवर्णनम् । प्रतिमाकरणं चैव स्थापना चित्रलक्षणम् कालव्यवस्था स्वर्गादि प्रतिसर्गादिलक्षणम् । पुराणलक्षणं चैव भूगोलस्य च निर्णयम् || निरूपणं तिथीनां च श्राद्धकल्पमनंतकम् । मुमूर्पोरपि यत्कर्म दानमाहात्म्यमेव च ॥ भूतं भव्यं भविष्यच्च युगधर्मानुशासनम् । उच्चावचविधानं च प्रायश्चित्तादिकं च यत् || षष्ट्याधिकाष्टसाहस्रं नवश्लोकशतोद्भवम् । पंचतंत्र समायुक्तं प्रतितंत्रे च विंशतिः || पंचोत्तरं तथाऽध्यायाः पुराणेऽस्मिद्विजोत्तम । विष्णुपर्वातील अष्टमी आदि कल्प यांत नाहीं; तेव्हां हें मध्यमपर्व नांव कोठून आले कोणास माहीत ? हें पुराण ( म्ह. मध्यपर्व १ ) २५४५ = १२५ अध्यायांचें, पांच तंत्रांचें व ८९६० श्लोकांचें आहे असे म्हटलें आहे.. त्याप्रमाणें या मध्यमपर्वाची परीक्षा करितां यांत तीन भाग, २१+२०+२०=६१ अध्याय ३११४ श्लोक आहेत; म्हणजे या पर्वाच्याच गणनेप्रमाणे यांत २ भाग, ६४ अध्याय, व ५८४६ श्लोक
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१२७
Appearance