Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण, यथा स्कांदं तथा चेदं भविष्यत्कुरुनंदन ॥ १०५ ।। स्कांदं शतसहस्रं तु लोकांना ज्ञातमेव हि । भविष्यमेतदृषिणा लक्षाघे संख्यया कृतम् ॥१०६ । ब्राह्मपर्व, अ. १ ला. यांत मूळचीं पुराणें सर्व १२।१२ हजारांचीं होतीं, ही अत्यंत मह- वाची परंपरा आढळते. मग हीं पुराणें उपाख्यानांनी वाढलीं ! जसे स्कंदपुराण एक लक्षाचें आहे, तसेंच हैं भविष्यदेखील ५० हजारांचें आहे !!! भविष्याची संख्या भागवत व मात्स्य यांत १४५०० श्लोक आहे. या दोन पुराणांच्या वेळी स्कंदपुराणही ८१,००० श्लोकांचें होतं. पुढें स्कंदपुराण १९ हजारांनी वाढून एक लक्षांचें झालें व भविष्यही आपलें स्वरूप ( १४३ हजारांचें ) सोडून ५० हजारपर्यंत वाढण्याची हांव धरूं लागलें ! पण हल्लीं प्रचलित भविष्य एकंदरीत २७००० इतकेंही भरत नाहीं ! भविष्यांत कशाला कशाचाही मेळ नाहीं !!! हल्ली या पुराणाची संख्या येणेंप्रमाणे आहे:- ११४ ब्राह्मपर्व -- मध्यमपर्व -- प्रतिसर्गपर्व- भविष्योत्तरपर्व- -- - अध्याय २१६ २०८ लोकसंख्या ९०३६ ३११४ ६२३२ ८५९२ २६, ९७४ प्रतिसर्गपर्वात ४ अध्यायांपर्यंत, सूर्यचंद्रवंशांच्या यादी असून पुढील भविष्यांत गमतीचा मजकूर आहे. पुढे आदम व ईव्ह ( हव्यवती), ईदन ( प्रदान ) नगर, पापवृक्षतलं, न्यूह ( नोहा ), चंद्रगुप्ताचा सुलूकाच्या