Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरे, १११ पूर्वीचाच मजकूर असल्याप्रमाणे वाटतें. सौरधर्माचें इतकें विस्तृत व कंटाळवाणे वर्णन दुसरे कोठेंही नसेल. या पर्वाचे फक्त १२६ अध्याय विल्सन यांस मिळाले होते; शिवाय भविष्योत्तर म्हणून सुमारे १४००० ग्रंथ त्यांस मिळाला होता. हैं ब्राह्मपर्व जुनेच असावें असें दिसतें; यांतील एक उतारा बाराव्या शतकांतील अपराकांच्या याज्ञवल्क्यस्मृतीवरील टीकेंत आढळतो (आनंदा- श्रम ग्रंथांक, ४६, पृ. १६ ). तो उतारा म्हणजेः-- ' तथा च भविष्यपुराणम् । अष्टादश पुराणानि रामस्य चरितं तथा । विष्णुधर्मादिशास्त्राणि शिवधर्माश्च भारत || कार्ण्यश्च पंचमो वेदो यन्महाभारतं स्मृतम् । सौराश्च धर्मा राजेंद्र मानवोक्ता महीपते ॥ जयेति नाम चैतेषां प्रवदंति मनीषिणः ॥ , हे लोक भविष्यपुराण, ब्राह्मपर्व, अध्याय ४ मधील ८७-ते९० हे आहेत. यावरून अपरादित्याच्या वेळीं भविष्यपुराणांत वरील श्लोक होते हैं ठरतें. तसेंच, श्रीशंकराचार्यांनींही भविष्यपुराणांतील उतारे घेतलेले आहेत. अपरादित्यानें भविष्यत्पुराणाबरोबरच भविष्योत्तरांतूनही उतारे घेतलेले आहेत. यावरून भविष्योत्तर तेव्हां होतें हैं कळून येईल. या ब्राह्मपर्वात एकंदर २१६ अध्याय व ९०३६ श्लोक आहेत. हल्लींच्या भविष्यपुराणांतील मध्यमपर्व ही काय चीज आहे व तें पूर्वीचें कोणतें पर्व असावें हें कांहींच कळत नाहीं; कारण, नारदसूचीशीं याचा कोठेंच मेळ नाहीं. हें विष्णुपर्व, शैवपर्व अगर सौरपर्व ह्यांपैकी १ ' नारदोक्ता ' असा हल्ला भविष्यांत पाठ आहे,