पुराणानिरीक्षण. अध्याय १७ मध्यें ब्रह्मदेवाची पूजा व त्याच्या देवळांचें व पूजेचें महत्त्व सांगितलें आहे. तेव्हां वर्षारंभ कार्तिकांत व मास पूर्णिमान्त अस- ल्याचें वर्णन आहे. तेव्हां कार्तिक कृष्ण प्रतिपदेस वर्षारंभ होत असे. यावरून हें वर्णन व हा भाग प्राचीन दिसतो; प्रतिपदेसच ब्रह्मदेवाची पूजा करावयाची ! कार्तिक कृष्ण प्रतिपदा; श्रावण कृष्ण द्वितीया; ( अशून्यशयना द्वि. ); तृतीया ( गौरीव्रत); विनायक चतुर्थी, अंगारकी चतुर्थी; नागपंचमी; ( सर्पसत्र आस्तिकानें थांबविलें, ती पंचमी तिथि होती, ही भाद्रपद कृष्ण पंचमीस करावी असे म्हटले आहे; म्ह. हल्लींच्या मानानें ती श्रावण शुद्ध पंचमीच होते ); स्कंदपष्टी; सूर्यसप्तमी ( रथसप्तमी ) — या सात तिथींचे कल्प नारदसूचीप्रमाणे ब्राह्मपर्वोत असावयास पाहिजेत. [११० हल्लींच्या ब्राह्मपर्वाच्या अ० ४८ मध्ये भास्करसतमीबद्दल श्रीकृष्ण व सांब यांमधील संवाद आहे. अ ४९ ५२ पर्यंत सूर्याच्या देवळांची वर्णनें, त्यांचं माहात्म्य, व त्याच्या पूजेचा विधि हे विषय आहेत. रथसप्तमी माघ शुक्ल सप्तमीस होती. पुढें सप्तमीकल्पाचाच विधि असून अध्याय २१६ पर्यंत सूर्याचंच माहात्म्य वर्णिलेले आहे. एकंदरीत या पर्वात सूर्यमाहात्म्य व त्याची पूजा वगैरे बराच प्राचीन मजकूर आढळतो. पर्व अ० २१६ ला संपतें असें ( २१६ - ३० श्लोक ) यावरून दिसतें ' तथेदं परमं पर्व कथितं ब्रह्मसंज्ञितम् ' ब्राह्मवत बहुतकरून सर्व
- या ४३।४४ अध्यायांतील विषय वज्रसूचिकोपनिषदाशीं ताडून
पहाण्यासारखा आहे. वज्रसूचिकोपनिषदही बरेंच प्राचीन आहे. त्यावर शंकरा- चार्याची टीका असून, शिवाय इ० पू० पहिल्या शतकांतील बौद्धआचार्य अश्वघोष याची त्यावर टीका ( विघातक ) आहे. यावरून हे वज्रसूचिकोप- निषद इ० पू० दुसऱ्या शतकाइतकें तरी प्राचीन असले पाहिजे.