Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ पुराणानिरीक्षण. भविष्यपुराण, ९ वें. या पुराणाविषय फारच गडबडगुंडा आहे. पंडित ज्वालाप्रसाद यांस हली चार प्रकारचीं भविष्यपुराणे मिळालेली आहेत. या चारीतही भविष्यपुराणाची थोडी थोडी लक्षणे मिळतात असें त्यांचे म्हणणे आहे. या चारींशिवाय, 'भविष्यद्ब्रह्मखंड ' किंवा 'ब्रह्मांडखंड' नांवाचा एक भूगोलविषयक संस्कृत ग्रंथही आपणास मिळालेला असल्याबद्दलही त्यांनीं लिहिले आहे. हे खंडही त्यांच्या मतें प्राचीन आहे. वरील चार प्रकारच्या भविष्यपुराणांविषयीं पंडितजी म्हणतात की, यांपैकी एकासही आपण आदिभविष्यपुराण म्हणून ग्रहण करूं शकत नाहीं. मत्स्यपुराणांत याविषयीं असे लिहिलेलें आहे की:- यत्राधिकृत्य माहात्म्यं आदित्यस्य चतुर्मुखः । अघोरकल्पवृत्तांत प्रसंगेन जगत्स्थितिम् || मनवे कथयामास भूतग्रामस्य लक्षणम् । चतुर्दशसहस्राणि तथा पंचशतानि च । भविष्यच्चरितप्रायं भविष्यत्तदिहोच्यते । यावरून, यांत ब्रह्मदेवानें आदित्यमहात्म्याचा प्रारंभ करून अघोर- कल्पाच्या हकीकतीच्या प्रसंगानें जगाची स्थिति व सर्वभूतांचें लक्षण-हीं मनूला सांगितलीं असून, त्यांत बहुतेक भविष्यकाळचीं चरितें व १४५०० श्लोक होते हैं कळून येईल. शैवपुराणाच्या उत्तरखंडाच्या मतें “भविष्योक्तेर्भविष्यकं " हेंच भविष्य- पुराणाचें लक्षण आहे; वर मत्स्यानेही भविष्यच्चरितप्रायं भविष्यत्तदिहो- च्यते' असेंच म्हटले आहे. आतां नारदपुराणाची सूची या पुराणाविषय काय म्हणते हैं आपण पाहूं:- C