प्रकरण दुसरें. १०३ हल्लींच्या अग्निपुराणांत ३५० ते ३६७ अध्याय अखेरपर्यंत अमर- कोशांतील स्वर्गादि अनेक वर्गाचे उतारे आढळतात. हा अमर जर विक्रमाच्या वेळेचा धरिला तर प्रश्नच नाहीं; पण जरी ५ व्या किंवा ६ व्या शतकांतला धरिला तरी इ० स० ५०० ते ५५० हा अग्निपुराणाच्या सद्यःस्वरूपाचा काळ म्हणून धरण्यास कांहींच हरकत नाहीं ! ! यावरून मार्गे आम्ही नारदपुराणाच्या सूचीचा इ. स. ५०० ते ६०० हा जो काळ ठरविलेला आहे तो जवळ जवळ बरोबर आहे हैं कळून येईल; कारण असे की, नारदपुराणाच्या अग्निपुराणसूचत ' कोषः स्वर्गादिवर्गके ' असा उल्लेख असल्यामुळे, ह्या सूचीच्या वेळीं या पुरा- णांत अमरकोशांतील उतारे होते हैं निःसंदेह ठरतें; मग अमराचा काळ ५०० इ. स. धरिला तरी नारदसूची ६०० च्या सुमाराची धरण्यास बिलकूल हरकत दिसत नाहीं ! पण अमरकोश याहून प्राचीनतर धरिल्यास काळगणनेची खेंचाखेंच होत नाहीं ! जसेंः-- कुब्जिकातंत्र इ. स. ३०० सुमारें. अमरकोश इ. स. ३००-४००. प्रचलित अग्निपुराण इ. स. ४०० - ४५० सुमारें. वृद्धशातातपस्मृति इ. स. ५००-६०० सुमारें. नारदपुराणसूची इ. स. ५०० - ६०० सुमारें.
- श्रीशंकराचार्य इ. स. ७८८-८२०.
यांत थोडेंसें आगेमागें करावें लागेल; पण सामान्यतः हे काळ बरोबर दिसतात. अमरकोश इ. स. ५०० त घेतला तर काळमानाची भारी गर्दी होते; म्हणून वरील काळच सामान्यतः बरोबर दिसतात.
- तसेंच “ आत्मविद्या च देवि त्वं इति श्रीस्तुतौ ' असा उतारा विष्णुसहस्र-
नामभाष्यांत आचार्यानीं अग्निपुराणांतील श्रीस्तुतीतील दिलेला आहे. (अ.२३७)