पान:पुत्र सांगे.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आजहि कुठं तिलक कामोद' रागातील सुरावट ऐकली की पहाटेच्या वेळी तंबोऱ्यावर 'रघुबीनऽजीवन असार भासत' ही त्या तिलक कामोदातील चीज आळवत बसणारी माझी आई मला आठवते. आणि मग तिच्यासाठी आपण कांहीच करु शकलो नाही या जाणिवेने डोळे ओलावतात !


***



(७८)