पान:पुत्र सांगे.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा थोर माता-पित्यांच्या पोटी जन्म मिळाला म्हणून धन्यता तर वाटतेच पण त्यांच्या एकंदर योग्यतेच्या मानानं आपण त्यांची सेवा केली नाही, असंच राहून राहून वाटतं. किती तरी गोष्टी आठवतात आणि त्याची पूर्तता आपण करु शकलो नाही, ह्या जाणीवेने मन खंतावतं ! तेव्हा ह्या पहिल्या मासिक श्राध्दाच्या निमित्ताने परमेश्वरा जवळ मागणं एकच की बाबारे, पुढील जन्मी ह्याच माता पित्याच्या पोटी जन्म दे आणि अपुरी राहिलेली सेवा त्या जन्मात पुरी करू दे.



*****


(७१)