पान:पुत्र सांगे.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झिजवावा लागतो, झीज सोसावी लागते, लोखंडाचे चणे खावे लागतात तेव्हां लोकमान्यत्व मिळते. पण या गोष्टी करण्याचे हे तथाकथित बुध्दिवंत कटाक्षाने टाळतात. निवडणुकीला आपण उभे राहिलो म्हणजे लोकांनी विनासायास आपल्या पेटीत मते टाकली पाहिजेत असा त्यांचा अहंगड़ असतो. लोक आपणास मते देत नाहीत याचा अर्थ लोकांना बुध्दिवंत आवडत नाहीत असा ते लावतात ! पण वस्तुस्थिती याच्या उलट असते. अज्ञानी जनांविषयी खरी खुरी सहानुभूति, कळवळा, आस्था व प्रेम त्यांनी दाखविले तर जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचू लागेल. पाण्यात राहून त्यांनी माशाशी वैर करु नये. श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या सारख्या थोर विचारवंतानी व्यक्त केलेल्या कांही विचारांच्या संदर्भात, भारतीय समाजांत बुध्दिवंताना त्यांचे योग्य स्थान कां मिळत नाही याची ही दुसरी बाजू आम्ही हेतूत: दाखविली आहे.

- सा. दक्षिण महाराष्ट्र
दि. २१/२/१९७२
(४४)