"या कादंबरीतील जवळजवळ सर्वच पात्रं मला आवडली, विशेषतः मार्टीचे. दुर्देवाने तिच्या प्रेमाची पूर्तता झाली नाही, तरी तिनं ज्याला आपला प्रियकर मानला त्याच्यावरील प्रेमाशी ती एकनिष्ठ राहिली. त्याच्या मृत्यूनंतरसुध्दा त्याच्या थडग्यावर ती नेमाने फुले वाहत असे. त्याच प्रियकरावर प्रेम करणारी त्याची आणखी एक प्रेयसी होती. ती दुसरी प्रेयसी जेव्हा आपल्या पतीकडे परत गेली तेव्हा या मार्टीला विलक्षण आनंद झाला. आता आपल्या प्रेमात प्रतिस्पर्धी नाही म्हणून ! (गंमत आहे ना, इकडे प्रियकर तर केव्हाच देवाघरी गेलाय ) अत्यानंदाने ती त्या प्रियकराला उद्देशून म्हणते. 'Now, my own, own love!.' she whispered, ‘you are mine, and only mine ; for she has forgot thee at last, although for her you died ! But I--- whenever I get up I will think of thee, and whenever I lie down, I will think of thee again. भावनातिकाराने शेवटी ती उदगारते If ever I forget your name let me forget home and heaven!.......... But no, no, my love, I never can forget thee, for you was a good man, and did good things ! इंदु, Man च्या ठिकाणी Woman हा शब्द घातला तर मलाही तुझ्यासंबंधी असंच म्हणता येईल. खरोखर तू थोर स्त्री होतीस. विसरु म्हटलं तरी मला तुला विसरता येणार नाही. तुला विसरणं म्हणजे घराला, जगताला, परमेश्वराला व स्वतःला विसरणं आहे. तुझ्या ठायी हाच माझा दृढ भाव आहे. त्या भावनेवरच मी जगतो. "
वरील नोंद मला सूचक वाटली, कारण दादांच्या मनात आईची मानसपूजा रोजच्या संवादलेखनातून बांधावी असं आलं याचे मूळ प्रेरणास्त्रोत कदाचित ही कादंबरीच असावी. कारण त्या कादंबरीमधील मार्टा जशी प्रियकराच्या समाधीवर नित्यशः फूल चढवते तसे दादा एकेक स्मृतीपुष्प रोजच्या रोज वाहत. अर्थात साम्य एवढ्या पुरतेच मर्यादीत आहे. नीट विचार केल्यावर वाटलं तसे नसावं. एरवी दादांनी स्वत:च सुरुवातीला तसा उल्लेख केला असता. त्यातून ही नोंद आहे १४ जून १९७९ ची, म्हणजे दादांनी डायरी लेखन केल्यानंतर पाच वर्षानंतरची. असो.
हे संपूर्ण वाचन करणं माझ्यासाठी एक थरारक अनुभव होता. त्या चार हजार पानांमधील वाचता न येणाऱ्या अगदीच अस्पष्ट असणाऱ्या पृष्ठांनी मला फार हुरहूर लावली कारण त्यातून आपण बरंच कांही 'मिस' केलं असावं याची बोच