पान:पुत्र सांगे.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कालिदासाच्या यक्षाने आपल्या प्रियेला पाठवलेले संदेशच आहेत." त्या भारावलेल्या अवस्थेत तिने एक उत्स्फुर्त कविता लिहिली. या भूतलावरील वास्तव्य संपवून दादा. आईला भेटायला निघाले आहेत अशी कल्पना करुन, माझ्या मैत्रिणीने दादांच्या भूमिकेतून लिहिलेल्या कवितेनेच, आई-दादांच्या अलौकिक भावजीवनाला सश्रध्द होऊन ही प्रदीर्घ शब्द भावांजली संपवतो.

'अज मी शापित राजा
गृहिणी सचिवः सखी मिथ:
प्रिय शिष्या ललिते कलाविधौ ।
ती तू इंदूमती गतजन्मीची
जरि या जन्मी रामकृष्ण मी तुझा
विलाप करण्या पुनरपि उरलो
अज मी शापित राजा ॥
एकाकी विदीर्ण विरही मी
तव अंतराय साहू कसा ?
तू अशरीरी मी शरीरी मग
तुजसंगे संवाद साधू कसा ?
शरीर त्यागिले आलो वेगे
पुनर्मीलना मार्ग न उरला दुसरा
पुनरपि हो तू मम इंदूमती
जरी शापित अज मी राजा । '
***
(२३)