या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
[ १२ ] वेच आहे । सरलें पाहे मग खोटें ॥ ३ ॥ उघडें दुकान उघड़े दुकान | रात्र जाली कोण सोडी मग ॥ ४ ॥ तुका म्हणे अंत- काळीं । जाती टाळीं बैसोनि ॥ ५ ॥ प्रार्थना अभंग. तुजविण वाणी आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो । १ । तुजविण चित्ता आवडे आणिक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥२॥ नेत्री आणिकांसि पाहीन आवडी। जावु तोच घडी चांडाळ हे ||३|| कथामृतपान न करिती श्रवण | काय प्रयोजन मग यांचें ॥ ४ ॥ तुका म्हणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंवतां ॥ ५ ॥ भजन. पद - ( कालंगडा ) यावी ह्याची बापा । तुज करूणा बा ॥ धृ० ॥ आहें पापी कुमति जरी ही | बाळ परि मी तुझें असें दीन ॥ य.वी० ॥ १ ॥ पाय राहो जाने तझ्या हा । मागूं शिशु मी विमो दुर्जे काय ॥ यावी० ॥ २ ॥ होउनी तूं सदय परेशा । आस परवीं त्वरें अनाथाची ॥ यावी० ॥ ३ ॥