[ १३ ] आरती. जयदेव जयदेव जय जय जगदीशा । शरणागत दासातें के पदरी ईशा || धृ० ॥ सत्यसनातन तूं प्रभु शिव मंगलदाता । निरअवयव अससी तूं व्यापक गुणवंता || अविनाशी अविकारी विश्वभरत्राता । भवनदतारक अससी सत्य गती दाता ॥ जय० ॥ ॥ १ ॥ खयंप्रकाशं अवर्धे अद्भुत जग राचेलें । ऋषिमुनि तव कृति पाहुनि विस्मित बहु झाले || पंडित बुधजन थकले वेदहि ते श्रमले । भक्तहि आनंदाने नाचूं लागले ॥ जय • ॥ २ ॥ धर्म ग्लानी होतां युगिं याग संभवसी । साधु जनांतें घाडुनि जगतां उद्धरसी | विषय कुसंगा सोडुनि शरणचि जो तुजसी । सत्य रक्षिन ऐतें आश्वासन देसी ॥ जय० ॥ ३ ॥ घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझें । प्रेमें आलिंगिन आनंदें पूजिन मावें ओंवाळिन म्हणे नामा ॥ १ ॥ त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं ममदेवदेव ॥ १ ॥ कायेनवाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मनावा प्रकृति स्वभावात् ॥ करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पये तत् ॥
पान:पुणें प्रार्थनासमाज द्वाविंशतितमोत्सव.pdf/१४
Appearance