या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
नम्र भाव याचितों तुझा बा संग ऐसा तब घडो सर्व काळ । तुझे ठाय होउनी सदा लीन बिकट मृत्यूचे पाश करी छिन्न ॥ २ ॥ ३ साक्या. नाशवंत हे सर्व ठाउके परि नच होय विरक्ती ॥ अहंपणाचे ओझे वाहुनि भोगूं फार विपत्ती || आमुची कष्टदशा || वारी कोण दुजें ईशा || १ || त्वदर्शित ह्या भक्तिपथाने चित्ती वाटे जावें ॥ परि निर्बल मी प्रपंच विपिनीं कैसे धैर्य धरावें ॥ मन हे भ्रम घेतें || न सुचे काय करावें तें ॥ २ ॥ पुरे पुरे हे हाल दयाळा कुठवर अंत पहासी ॥ दर्शन देउनि निजदासातें रक्षी तव ब्रीदासी ॥ येऊं दे करुणा || दीनां ठाव देई चरण॥ ॥ ३ ॥ ४ अभंग. ये गा जगदीशा जीवन जिवांच्या ॥ आम्हां अनायांच्या माहेरा ये॥धृ॥ भेटावया तूज ओढे माझा जीव || एक वेळ पाय दाव डोळां ॥१॥ आणिक हे आर्त नाहीं नारायणा || धांवे ही वासना भेटावया ॥२॥