Jump to content

पान:पुणें प्नाथेंनासमाज चतुर्विंशतितमोत्सव.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २) अद्भुत लीला अगाध महिमा, रम्य तुझीं करणीं । घ्यावुं, गावुं हीं अनन्य भाव चित्त स्थिर करुनी ॥ प्रपंच विसरूनि क्षणभर होऊं दंग तुझे पायें | स्वरूप जे तव ॥१॥ या समायें प्रत्यय उपजे मान नेमुनि त्वां ठेवा | अनंत आनंदाचा आह्मा ठेवियला देवा || मोठें भाग्य, तथापि कैसे प्राप्त होइ अधमा । प्रपंच ज्याचा देव, वश्य जो सदा क्रोध कामा || क्षणभरि होउनि चित्त शुद्ध हें रमो तुझ्या ठायीं | स्वरूप में तव ||२|| विव्हल होउनि पुसतों देवा दुरित कर्दमीं न्हाय । पुनः पुनः जो अविवेकें त्या उन्नति घडेल काय || नैराश्ये मन स्तब्ध बसे तैं उमटे मंजुल ध्वनि । भिऊं नको बा पिता तुझा मी दक्ष असे अवनीं ॥ म्हणुनि नम्र उत्साहें होउनि पाय तुझे ध्यायें। स्वरूप जें तव ॥ ३ ॥ २ दिंड्या. समागम तव होतसे सदय जेव्हां गळुनि जाई मर्त्यत्व भाव तेव्हां । सकल शोकाचा होउनियां अंत वसे आनंदि अमृत लोकिं स्नात ॥ १ ॥