Jump to content

पान:पुणें प्नाथेंनासमाज चतुर्विंशतितमोत्सव.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४ ) केला घरांत रिघावा | ठार्यिपाडियेला ठावा ॥ २ ॥ हाता चढे धन | ऐसे रचले कारण । तुका ह्मणे मिठी | पाय देउनेि केली लुटी ॥ ३ ॥ विशेष प्रार्थना. अभंग. - राग बागेसरी. येउनी जाउनी पाहे तुजकडे । पडिल्या सांकडें नारायणा ॥ १ ॥ निष्ठुर अथवा होईं तूं कृपाळ | तुज सर्वकाळ विसरेना || २ || आणिक कोणाचा मज न आधार | तुजवरी भार जीवें भावें ॥ ३ ॥ तरी तुज कांही करणे उचीत | तारी हा पतीत तुका म्हणे ॥ ४ ॥ भजन. अभंग - राग मालकंस. - अभय दान मज देइंगा उदारा | कृपेच्या सागरा मायबापा ॥ १ ॥ आतां सर्व भाव ठेवियला पायीं । आणीक मीं कांहीं नेणें दुजें ॥ २ ॥ सेवा भक्तिभाव नेणें मी पतीत | सर्व माझें हित तुझ्या पायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तुझे नांव दीनानाथ | ते मज उचीत करी आतां ॥ ४ ॥