Jump to content

पान:पुणें प्नाथेंनासमाज चतुर्विंशतितमोत्सव.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५ ) आरती. जय देव जय देव जय मंगलधामा । भावें भजतो तुनला दे सुख विश्रामा || धु० || तव ध्याने आमुचें मन मोहित झाले || म्हणुनी मनमोहन हें नाम तुल। दिधलें ॥ तव भजनामृत प्राशन आवडिने केले || करुणाकर देवा सार्थक हें गमलें ॥ जय० ॥ १ ॥ देवा केलें तुवां अगणित उपकार | सकळ ब्रम्हांडाचा तूंचि आधार || निजभक्तांचा घेशी माथां तूं भार | ऐशी करुणा तूझी देवा अपार ॥ जय० ॥ २ ॥ अर्पू तनुमनधन हे अवघें दृढचित्तें । पात के आह्मी परि तूं उद्धरि दासांतें | शिशु हारी येतां रक्षावें तातें । सां- भाळी धरुनीयां निजभक्तां हातें ॥ जय० ॥ ३ ॥ भावें प्रेमें अनु- दिन करूं तुझी सेवा | आनंदाचा देवा दिन ऐसा यावा ॥ तो त्वां करुणागारें सत्वरि आणावा । हीच प्रार्थना बा तुजपाशीं देवा ॥ जय० ॥ ४ ॥ ब्रह्मरुपाहिकेवलं । एकमेवाद्वितीयं । सत्यमेव जयतेनानृतम् ॥