या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८५
पीटर दि ग्रेट
सुमारें दोनशे वर्षांच्या इतिहासांत रशियाचा विस्तार बराच झाला; भयंकर ईव्हॅन्, बोरीस इत्यादि पराक्रमी राजे झाले; सायबेरियाचीं वैराण अरण्यें रशियाला जोडलीं गेलीं; पोलिश राजांच्या स्वाऱ्या रशियावर
आल्या; स्वीडनशीं कटकटी माजून तहनामे झाले; शेवटी घरगुती भांडणे विकोपास जाऊन सिंहासन मोकळें पडलें. या सिंहासनावर