Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१८६
 

कोणास बसवावें याबद्दलची भवति न भवति होऊन रोमॅनोवू आडनांवाच्या सरदार घराण्यांतील मायकेल नांवाच्या सोळा वर्षांच्या मुलांस सिंहासनावर बसविण्याचें ठरलें. या सरदार घराण्याचा व पूर्वीच्या झारचा शरीरसंबंध झालेला होता. येवढ्या बळावर या घराण्यास राजवंशाचे वैभव प्राप्त झालें.
 या मायकेलनें इ० सन १६४५ पर्यंत राज्य केलें व पुढे त्याचा मुलगा आलेक्झी हा गादीवर बसला. हा राजा सुधारणाप्रिय होता. त्याने पहिली गोष्ट केली, ती ही कीं, त्यानें कायद्याचें कोड वाढविलें. त्याच्या अनेक कायद्यांपैकी एक असा होता, कीं जो कोणी चिलीम ओढील त्याचें नाक कापून टाकलें जाईल! चिलीम ओढणारे लोक नाकांतून धूर सोडतांना पाहून राजा फार चिडत असावा असें दिसतें. पण हा राजाचा चिडखोरपणा व हा निर्बंध चिरंजीवांनी अतिरेक करूनच घालविला. कारण पीटर हा अतिशय तमाखू ओढूं लागला! राजाला कामांची हौस फार असे, स्वतः तो स्वस्थ बसत नसे व दुसऱ्यास बसू देत नसे. वाड्यापुढें एक तक्रार अर्जाची पेटी ठेविलेली असे. अर्ज पाहून राजा रोजच्या रोज त्यांचा निकाल लावी. रात्रींच्या वेळीं तो प्रधानांच्या टेबलांचे खण उघडून पाही व कांहीं कामें शिल्लक राहिली असल्यास त्यांस जाब विचारी.
 शेजारच्या लोकांशी मिळतें घेऊन राज्य वाढविण्याचीही त्याची मोठी खटपट असे. पुढें रशियाच्या इतिहासांत शौर्याबद्दल नांवाजलेले जे कोसॅक स्वार त्यांचे पूर्वज जरी स्वतंत्र टोळ्या करूनच रहात असत, तरी पोलंडच्या राजानें आपणांस आपले म्हणावें अशी त्यांची फार खटपट असे. पण त्याला आपले हित कळेना. तो त्यांच्यावरच जबरदस्ती करूं लागला. शेवटी या लोकांनी आलेक्झीकडे आश्रय मागितला. त्यांचे धैर्यशौर्यादि गुण पाहून राजाने त्यांस आपल्या अमलाखालीं घेतलें. तेव्हांपासून रशियन फौज शौर्याच्या बाबतींत चांगलीच समृद्ध