सोबेस्कीचे पोलंडांतील घोडेस्वार विलक्षण पराक्रमी होते. त्यांच्या दौडीपुढें वजीरसाहेबांचे मिजासी मुसलमान उभे राहीनात. सोबेस्की स्वतः सर्व रणांगणावर मारामारी करीत आणि तुर्की फौजा मागें चेंपीत सारखा चालला होता. पुढे मोठा रणगाजी म्हणून प्रसिद्धीस आलेला जो प्रिन्स युजीन तो या वेळीं सोबेस्कीच्या हाताखालीं उमेदवारी करीत होता! असें सोबेस्कीचें वैभव होतें. बराच वेळ रणधुमाळी उडाल्यानंतर तुरुक हळुहळू कच खाऊं लागला. सोबेस्कीने शेवटीं त्यांची फळी फोडली; इतकें होतांच सर्व तुर्की शिपाई जीव घेऊन दाही दिशा पळाले. त्यांनीं सामानसुमान किती टाकलें याला तर गणतीच नाहीं. वर सांगितलें आहे कीं, वजीरसाहेबांचा व एकंदर तुर्की लष्कराचा डामडौल फार मोठा होता. तुर्कांच्या या हबेलंडीचं वर्णन खुद्द विजय मिळवणाऱ्या सोबेस्कीनें आपल्या राणीस लिहिलेल्या एका पत्रांत फार सुंदर तऱ्हेनें दिलें आहे. तें पत्र असेंः-
"माझ्या चित्तास सदैव आनंदविणारी रमणीय प्रियकरणी मेरी ईस—
"परमेश्वराची स्तुति माझे मुखांतून सदैव होवो. आपल्या राष्ट्राला देवानें यश दिले आहे. असें यश पूर्वी कोणास कधीं लाभलें असेल कीं नाहीं, असें मला वाटतें. मुसलमान लोकांचा बडा तोफखाना, त्यांची अपार संपत्ति, इतकेंच नव्हे, तर त्यांची सगळी छावणीच्या छावणी आपल्या हाती लागली आहे. राजधानीला जाणारे सर्व रस्ते आणि भोवतालचें सगळें रान तुर्की शिपायांच्या प्रेतांनीं भरून गेलें आहे. जे कोणी आमच्या तावडीतून सुटले ते जीव घेऊन घाबरटपणानें पळून जात आहेत. तलवारीची टिपरघाई ऐन रंगांत आली असतांना, शत्रूने एकदम कच खाल्ली. जयश्री येवढी मोठी व इतकी अकल्पितपणें प्राप्त झाली कीं, राजधानींत व आमच्या शिबिरांतसुद्धां 'मुसलमान परत येणार! परत येणार!' म्हणून सारख्या भुमका उठत
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१८२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१७८