Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७९
जॉन सोबेस्की
 

आहेत; पण ते आतां कसचे येतात? हे पळपुटे कोट्यवधी रुपयांचा दारूगोळा छावणीत टाकून पळाले आहेत.
 "सध्यांच माझ्या डोळ्यांपुढे असा देखावा दिसत आहे कीं, ज्याची तहान मला फार दिवस लागली होती. शत्रूचीं हीं दारूगोळ्याचीं कोठारें आमचे शिपाई धडाधड उडवून देत आहेत. त्यांचे आवाज तर येवढे होय आहेत कीं, 'पृथ्वी गेली रे गेली' असें देव ओरडल असतील. पण आभाळांत उठलेले हे धुराचे लोट पाहून जरी मनाला समाधान वाटलें तरी होत असलेले नुकसान पाहून वाईट वाटतें. वजीरसाहेब घोड्यावर स्वार होऊन एका वस्त्रानिशीं पळून गेले; उरलेल्यांनी आपापले पहावें. आतां त्यांच्या वस्तूंचा वारसा मी आपल्याकडे घेतला आहे. कारण त्यांची बहुतेक दौलत माझ्या हातांत पडली आहे. या वजिराला चेंपीत चेंपीत बिनीच्या फौजेवर मी पुढे जात असतां त्याच्या एका नोकरानें मला त्याचे तंबू आणि खाजगी रंगमहाल दाखविला. हे तंबू इतके मोठे आहेत कीं, त्यांच्यांत सगळी वॉरशॉ राजधानी मावली असती. वजिराच्या पुढें डौलानें चालणारी सर्व निशाणें आणि तोरणें मीं हस्तगत केलीं आहेत; पण बादशहानें त्याजबरोबर दिलेलें महंमदाचें प्रचंड निशाण मात्र मीं मजपाशीं न ठेवतां रोमला पाठवून दिलें आहे. सांपडलेल्या सामानांत भरगच्ची तंबू, सुंदर कनाती आणि हजारों मोलवान् गमतीच्या चिजा आहेत. मी अजून त्या सगळ्या पाहिल्याही नाहींत; पण तुला एवढेंच सांगतों कीं, ह्या लुटीला दुसरी तोड नाहीं. बाणांचे चार पांच भाते माझ्या हातीं लागले आहेत. त्यांजवर बसविलेलीं रत्ने व इंद्रनील मणि लाखालाखांचे असतील. तार्तरी मुलुखांतला मर्द मुलुखगिरी करून परत आला; पण तो जर कां हात हालवीतच परत आला, तर त्याची बायको त्याला म्हणते, 'तुम्ही शूर मर्द नव्हांत; तुम्हीं मला कांहींच आणिलें नाहीं; जो शूर असतो तो जोराने तुरमुंडी