Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१४०
 

सरदार, दरकदार, विद्वान्, शास्त्रवेत्ते यांनी दरबार गच्च भरून गेला होता. कोलंबस तेथें येतांच सर्वांनीं खडी ताजीम दिली. प्रत्यक्ष राजा-राणी उभी राहिली व कोलंबस आतां गुडघे टेंकणार तोंच त्यास हात देऊन त्यांनीं उभें केलें. सर्वांना आनंदाश्रूंनी गहिवरून आलें. यत्न करूनही कोलंबसास शब्द उमटेना. शेवटी आनंदभार हलका झाल्यावर त्याने सर्वांस स्वमुखानें सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून राजाराणी खुष झाली. त्यांनीं देवाची प्रार्थना केली व त्याजवर बक्षिसांचा सडा केला. जो कोणी जमीन पहिल्यानें पाहील त्यास बडें पेन्शन मिळणार होतें. तेंही त्यांनीं कोलंबसासच दिलें. कारण रीड्रिगोच्या आधीं त्यानेंच उजेड पाहिला होता. पण यामुळे रीड्रिगो इतका रागावला कीं, हे सर्व लोक लबाड व खोटे ख्रिस्ती आहेत असें म्हणून तो वेडानें मुसलमान होऊन परागंदा झाला! असो. तेथें कोलंबसाच्या कर्तबगारीचा कळस झाला. कारण त्याचा जीवितहेतु पूर्णतेस गेला.
 वास्तविक त्यास या वेळींच मरण यावयास हवें होतें. कारण त्यानें येथून पुढे केलेल्या गोष्टी कोणाही सामान्य माणसास करतां आल्या असत्या; पण पुष्कळदां असें दिसतें कीं, जीवितहेतु संपल्यावरही कित्येक थोर विभूतिसुद्धां उगाच लुडबूड करीत जगत असतात व त्यायोगें त्यांच्या उज्ज्वल नांवास कलंक लागेशीं कृत्यें त्यांच्या हातून होतात. कोलंबसाचें असेंच झाले ती हकीकत थोडक्यांत देतों.
 एका सफरींत विजय आल्यामुळे कोलंबसास व राजास सारखाच हुरूप येऊन त्यांनी दुसऱ्या सफरीची तयारी केली. अशा पांच चार सफरी त्यानें केल्या. तेथें जावें, तेथिलांशी संबंध सुरू करावे, भांडणें निघावी, मारामाऱ्या व्हाव्या, तद्देशीयांच्या कत्तली व्हाव्या, त्यांच्या बायकापोरी जबरदस्तीनें ओरबाडाव्या, आपापसांत मारामाऱ्या