Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असे नाही. पण केशवसुतांना त्यांचे अनुकरण करावेसे वाटले नाही, इतके मात्र खरे. आरंभीच्या काळात संस्कृतकडे वळलेली त्यांची दृष्टी पुढे बदलून इंग्रजीकडे गेली असेही नाही. तर कधी इंग्रजीशी, तर कधी संस्कृतशी सांधा जोडण्याचा त्यांचा प्रयत्न शेवटपर्यंत चालू होता असे दिसते.
 मराठी कवींमध्ये ज्ञानेश्वरांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न तर केशवसुतांनी केलेला आहेच ( तत्त्वता बघता नामा वेगळा). पण रघुनाथ पंडितांचेही त्यांनी अनुकरण करून पाहिले आहे. याहीपेक्षा सर्वात चमत्कारिक गोष्ट म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या भागात आधुनिक मराठी कवितेच्या या उद्गात्याने मोरोपंतांच्यासारखी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्या कवितेत वेगवेगळ्या प्रकारची यमके, अनुप्रास, किंबहुना श्लेषांचाही प्रयत्न केला आहे. शेवटच्या परिपक्व अवस्थेत केशवसुतांचे मत मोरोपंत हा महाकवी होता व त्याच्यासारखे महाकाव्य पुन्हा लिहिले पाहिजे असे झाले होते. आपल्या काव्यजीवनाच्या आरंभापासून आपल्या काव्यजीवनाच्या समाप्तीपर्यंत केशवसुत संस्कृत, मराठी, इंग्रजी अशा नानाविध कवींकडे सारखे अनुकरणासाठी वळत होते व यांपैकी कुठेतरी आपल्या कवितेचा घनिष्ठ सांधा जुळवू इच्छीत होते. अचानक त्यांचे देहावसान झाले नसते, तर आर्या गीती वृत्तातील एखादे मोरोपंती वळणाचे खंडकाव्य लिन केशवसुतांनी अर्वाचीन मराठी कवितेच्या समीक्षकांना चांगलेच पेचात आणले असते, असे मानावयास जागा आहे.

 केशवसुतांच्या कवितेत आढळणारा स्पष्ट अनुकरणाचा हा धावता उल्लेख करण्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण असे की केशवसुतांच्या कवितेने इंग्रजी वळण गिरवयाचा प्रयत्न केला इतकेच पुनःपुन्हा आपण नोंदवितो हे सत्य नव्हे, या घटनेकडे लक्ष वेधावे. दुसरे कारण हे की या नोंदी केशवसुतांच्या लहानपणाच्या बोधक किंवा मोठेपणाच्या द्योतक अशा नाहीत, इकडे लक्ष वेधावे. कोणताही कवी एकाकी, शून्यात उभा राहू शकत नाही. तो मागे कुठेतरी आपला सांधा जोडण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रत्येक मोठा कवी आपल्या लगोलग मागच्या काव्यावर अत्यंत रुष्ट असतो. अशीच नवकवींच्या मनात रविकिरण मंडळाविषयी स्पष्ट दिसून येते. हीच रुष्टता समलीन काव्याविषयी केशवसुतांच्या मनात असण्याचा संभव आहे. अव्वल इंग्रजीतील ही कवितेशी केशवसुतांना समरस होणे शक्यच नव्हते. पण त्यांनाही कुठेतरी धरण्याही नावापुरता काट हवा असणारच. या काठाच्या शोधात केशवसुत हे कालिदासान भारवीपर्यंत आणि सुभापितकारांच्यापर्यंत, इमर्सनसारख्या बऱ्यापैकी कवीपासून मान्य कवीपर्यंत, व मराठीत ज्ञानेश्वरांच्यापासून मोरोपंतांपर्यंत फिरत राहिले. असा प्रयत्न केशवसुतांनी केला यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. हाच प्रयत्न अलेक्झांडर पोपच्या बाबतीत इलियटने केला आहे. आणि रामदास, तुकारामाशी सांधा जोडण्याचा प्रयत्न मढेकरांनी केला आहे. प्रत्येक मोठा कवी असा प्रयत्न करत असतो. उलट मला तर असे वाटते की इतका सगळा प्रयत्न करूनही केशवसुतांना स्थिरपणे

७६ पायवाट