साधन होतात. पण या साऱ्या बाबी तर्काच्या चिमटीत नीट पकडून एक सुसंगत दर्शन निर्माण करणे हा वा.लं.चा पिंड नाही. वाङ्ममयावर प्रेम करणे, आपल्या प्रतिक्रिया नोंदवणे हाच त्यांचा पिंड आहे. श्रेष्ठ वाङ्ममयाच्या संपर्कात आपण सोंदर्यापेक्षा, कलारमकतेपेक्षा साक्षात जीवनालाच सामोरे असतो हे वा.लं.ना जाणवते. हे जाणवत असल्यामुळे जीवनाचा संदर्भ ते टाळू शकत नाहीत. आणि वाङ्ममयीन मूल्यमापन नैतिकतेवर, उपयोगितेवर आधारलले असू शकत नाही हेही तितकेच उत्कटतेने जाणवत असल्यामुळे, ते आपण कलावादी आहोत, मूल्यमापनात वाङ्ममयबाह्य मूल्य आणण्याची आपली तयारी नाही हे सांगितल्याशिवाय राहू शकत नाहीत.
या आलोचनेच्या व्यवहारातच सहजगत्या वा.ल. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करतात, यात त्यांचे मोठेपण आहे, डार्विनचा वाङ्ममयसमीक्षेवरचा परिणाम खूपच मोटा आहे. जे टिकण्यालायक असेल तेच टिकते, उरलेले जीवनाच्या संघर्षात नष्ट होते, ही भूमिका ललित वाङ्ममयाच्या प्रांतात उलटी होऊन आली आहे. ती म्हणजे जे-जे दीर्व काळ टिकून राहिले आहे, ते ते श्रेष्ठ व चांगले असलेच पाहिजे असे मानण्याचा मोह समीक्षकांना होतो. मग लोक अक्षरवाङ्मयाची वैशिष्टये हुडकून काढू लागतात. एकेकाळी वा.लं.नी हा मुद्दा गृहीत धरला होता. वाचक वर्तमानकालात ज्यावेळी वाङ्मय उचलून धरतो, त्यावेळी प्रेयस्चा, रजन, करमणुकीचा भाग त्यात अधिक असतो असे ते म्हणत. उलट बाजूने कालमुखाने हाच वाचक जेव्हा कौल देतो, तेव्हा श्रेयसचा भाग अधिक असतो असे वा.लं.ना वाटे. पण काळाच्या प्रवाहात सामान्य आणि निरुपद्रवीही टिकून राहते. तुकारामही टिकतो व गुरुचरित्रही टिकते हे आता वा.लं.ना जाणवू लागले आहे. एक दिवस काळाच्या ओघात चांगलेही लुप्त होते हेही त्यांना जाणवेल, आणि मग टिकणे हा मुद्दाच त्यांच्या विवेचनात वाङ्ममयसमीक्षेतील अप्रस्तुत मुद्दा म्हणून उल्लेखिला जाईल या गोष्टीची खात्री वाटते. चटकन वा.लं.ना एखादा विचार सुचतो. मर्नेकर कलांची वर्गवारी लावीत असताना संगीताला सर्वश्रेष्ठ मानतात. कारण संगीताचे माध्यम सूर हे एकाच इंद्रियाशी निगडित असणारे शुद्ध माध्यम आहे. पण माध्यमाची शुद्धता ही त्या सगळ्या कलाप्रकारातच असणार. करीमलाँचे माध्यम आणि आडगल्लीतील एखाद्या 'टरे हुसेनखाँ 'चे माध्यम, दोघांचेही माध्यम शुद्ध स्वर हेच असणार. मग एका कलाप्रकारातील सारेच कलावंत एकाच तोलामोलाचे समजायचे की काय ? हे जर हास्यास्पद असेल, तर मग माध्यमाच्या शुद्धतेपेक्षा कलेच्या श्रेष्ठतेचे गमक वेगळे असले पाहिजे हे गृहीत धरून वा.ल. विचारतात- संगीत शुद्ध असेल, पण म्हणून ते श्रेष्ट कसे मानायचे? नेहमीनेहमी आपण कला आणि चारित्र्य यांचा विचार करतो. श्रेष्ठ कलावंत चारित्र्यवान असलाच पाहिजे काय ? काहीजण 'हो' म्हणतात; इतर काही 'नाही' म्हणतात. श्रेष्ठ चारित्र्यवानांनी निर्माण केलेले वाङ्मय कलेच्या दृष्टीनेही श्रेष्ठ असेल काय ? पुन्हा याची 'हो', 'नाही' अशी दोन उत्तरे येतात. पण हे सारे विवेचन वाङ्मयसमीक्षेला गैरलागू नाही काय? जे जीवनात आपण मंगल म्हणू , ते वाङ्मयात कदाचित कंटाळवाणे