पान:पायवाट (Payvat).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्विकारण्यास तयार नाहीत. जीवनवाद्यांचा एक आवडता सिद्धान्त वाङ्ममय व जीवन याच्या संबंधाचा आहे. ललित वाङ्ममयात समकालीन जीवनाचे प्रतिबिंब पडते इतकेच म्हणून जीवनवादी थांबत नाहीत. ज्या प्रमाणात हे प्रतिबिंब सर्वागीण असल, त्या प्रमाणात ते त्या कलाकृतीचे मोठेपण सांगू लागतात; कलावंताच्या व्यक्तिनिष्ठ प्रतिभाधर्माच्यापेक्षा सामाजिक वातावरणाचा एक परिपाक म्हणून ते कलेकडे पाहू लागतात. काळ बदलला की त्या काळाचे चित्रण करणारी कलाही मागे पडते, असे ते सांगू लागतात. त्याच्या दृष्टीने गुप्तकाळ इतिहासजमा होताच 'शाकुंतल' इतिहासजमा झाले पाहिजे, किंवा गुप्तकालीन जीवनाच्या माहितीचा संग्रह 'शाकुंतला'त आहे, म्हणून ते मोठे ठरल पाहिजे. काहीजण मग कण्याच्या उदार मानवतावादाचा दाखला देऊन 'शाकुंतला'चे माठयण सांगू लागतात, उरलेले काहीजण दुष्यंताच्या वेजबाबदारपणावर पांवरूण घालून राजेशाहीचे समर्थन करण्यासाठी कालिदासाने दुर्वासांचा शाप आणला हा 'शाकुंतला'चा दाप मानतात. जीवनवादी समीक्षा ही अशी असते. तिला वाङ्मयातील काही गृहीते मुळा मान्यच नसतात. कवी हे असत्याला सत्य भासविणारे थापाडे असू नयेत, यावर त्यांचा कटाक्ष असतो. यापैकी वा.लं.च्यामध्ये काहीच नाही. म्हणून वा.ल. जीवनवादी टीकाकार नाहीत; ते कलावादीच आहेत.
 पण कलावादी समीक्षा तंत्रवादी, रंजनवादी असलीच पाहिजे असे मानण्याचे कारण नाही. त्याप्रमाणेच जीवनवादी समीक्षा बोधवादी, उपयोगवादी असलाच पाहिज असहा मानण्याचे कारण नाही. एका बाजूने कलेला कारागिरीप्रधान करमणूक करणे अगर दुसऱ्या बाजूने कलेला सांकेतिक, भ्रष्ट, आक्रस्ताळी प्रचारसाधना बनविणे अपरिहार्य नाही. ललित वाङ्मयात सलग, स्वयंपूर्ण, जिवंत, उत्कट असा अनुभव असतो व तो सर्व चैतन्यानिशी प्रकट झालेला असतो हे जबाबदार कलावादी समीक्षकाने मान्य केलेच पाहिजे. जीवनवाद्यांनीही ही गोष्ट मान्य केली पाहिजे. जबाबदार जीवनवादी समीक्षक ही बाब मान्य करतातच. हे मान्य केल्यानंतर कलावादी व जीवनवादी यांच्यात नेमका फरक कोण्या ठिकाणी उरतो ? माझ्या मते तो एका महत्त्वाच्या ठिकाणी शिल्लकच राहतो. आणि ते म्हणजे कलात्मक अनुभवाला जे मूल्य निर्माण होते, त्या मूल्याचे स्वरूप कसे ठरविणार या ठिकाणी. इथे आपण आलो म्हणजे वा.ल. क्रमाने कलावादापासून कधी दूर तर जीवनवादापासून कधी दूर असे जाताना दिसतील. याचे कारण या प्रश्नाबाबत एक निश्चित उत्तर देताना त्यांची अडचण होत असावी हे आहे. आणि या अडचणीचे कारण वा.लं.ची समीक्षा हेच आहे.

 वा. ल. कुलकर्णी हे मराठी समीक्षेतील मार्मिक व रसिक आलोचनाकार आहेत. ही आलोचना करताना समीक्षेतील सत्याचे कण त्यांना सारखे जाणवत राहतात. त्यांची प्रामाणिक रसिकता या सत्यापासून त्यांना विचलित होऊ देत नाही. पण हे कण एकत्र साधून त्यांचे दर्शन बनविण्याचा काटेकोर प्रयत्न करणे वा.लं.च्या पिंडात नाही. कोणत्याही विधानात दडलेल्या अनेक गृहीतकृत्यांची बारकाईने चिरफाड करून पाहणे त्यांना आवडत

५४ पायवाट