पान:पायवाट (Payvat).pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असते. जीवनाच्या एका अवस्थेत साचा कळस होतो, तेव्हा नव्या प्रेरणा जन्माला येतात. या नव्या प्रेरणा आणि जाणिवा ज्या वातावरणात जन्माला येतात, ते वातावरण वर्तमानाच्या ऱ्हासाने घेरलेले असते. या नव्या प्रेरणा जितके नवे समर्थ वाङ्मय निर्माण करतात, तितके समर्थ वाङ्मय पुढे निर्माण होत नाही. या नव्या प्रबल प्रेरणा जुने ऱ्हासकालीन जीवन समाप्त करतात आणि तेथून एक नवा अध्याय सुरू होतो. हा नवा अध्याय सुरू होताना जीवनाची नवी अवस्था सुरू होते हे खरे असले, तरी मग प्रेरणा दुबळ्या होत जातात. वाङ्मयाचा सांधा जीवनाच्या अवस्थेशी जोडायचा की नव्याने निर्माण होणाऱ्या प्रेरणांशी जोडायचा हा जटिल प्रश्न आहे. द. ग. गोडसे हा सांधा जीवनाच्या अवस्थेशी जोडतात.
 आपण हे गृहीत धरू की, जीवनाचा आणि वाङ्मयाचा संबंध आहे. कलावंताच्या मनात असणारी सांस्कृतिक मूल्ये, त्याच्या निष्ठा यांचा तर वाङ्मयाशी संबंध येतोच, पण कलावंताच्या वैयक्तिक जीवनाचाही वाङ्मयाशी संबंध येतो. जीवनाचे प्रतिबिंब वाङ्मयात पडतेच. हे सारे गृहीत धरले, आणि माझ्यासारख्याला हे सारे मान्यच असल्यामुळे मान्यही केले, तरी खरा प्रश्न याहून निराळा आहे. जीवनवादी वाङ्मयसमीक्षेसमोरचे मूलभूत प्रश्न हे नव्हत. जीवनवादी समीक्षेसमोरचा मूलभूत प्रश्न हा आहे की, कलाकृती कशाला म्हणावे ? जीवनवादी परिभाषेच्या कक्षेत राहून कलाकृतीची व्याख्या देता आली पाहिजे. आणि ही व्याख्या अशी असली पाहिजे की, तिच्या आधारे ही कलाकृती आहे हेही सांगता यायला पाहिजे; ती श्रेष्ठ कलाकृती आहे हेही सांगता यायला पाहिजे. तांत्रिक पद्धतीने सांगायचे तर जीवनवादी समीक्षेला कलाकृतीची अशी स्वतःची व्याख्या सिद्ध करता आली पाहिजे की, ज्या व्याख्येच्या आधारे अ-कलांपासून कलांचा व्यवच्छेद टाकता आला पाहिजे आणि कलाकृतींची प्रतवारी ठरविण्याचा निकष या व्याख्येतच आणि व्यवच्छेदक लक्षणांतच निहित असला पाहिजे. हा मुद्दा जीवनवादी समीक्षेने गंभीरपणे कधी हाताळलेलाच नाही. जीवनवादी वाङ्मयसमीक्षा या प्रश्नांपर्यंत जाते आणि नंतर तेथून कोठे तरी बाजूला सरते. जे स्वतः मोठ्या आग्रहाने जीवनवादी समजतात आणि मुलाखत देताना छातीवर हात मारून जोराने सांगतात की मी जीवनवादी आहे (मी स्वतःच अशा मंडळींच्यापैकी एक आहे.), त्यांनीही कधी या प्रश्नाला तपशिलाने हात घातलेला नाही. जीवनवादी समीक्षेच्या दृष्टीने मराठीत कलाकृतींची व्याख्या देण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न दि. के. वेडेकरांनी केला होता. हा प्रयत्न पुरेसा संदिग्ध व अतिव्याप्तीच्या दोषाने युक्त तर होताच, पण त्यांचा त्यांनाही तो कधी समाधानकारक वाटला नाही.

 हे जसे जीवनवादाचे आहे, तसेच कलावादाचे आहे. सर्व कलावादी समीक्षेची सर्वात महत्त्वाची अडचण असेल तर ती ही आहे की, त्यांच्यासमोर दोन परस्परविरोधी प्रश्न आहेत. आणि या प्रश्नांचा समन्वय लावण्यात तर त्यही,ांना यश येतच ना पण आपल्या मूलभूत प्रतिपादनाला पुरेसा पुरावा देण्यातही अजून त्यांना यश आलेले नाही.

१८० पायवाट