पान:पायवाट (Payvat).pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देव, असुर आणि ऋषी कुणाचेही मन चोरील. हे सुभगे, तुला नृत्याची गरजच काय ? कोणत्याही सामन्यात जय मिळविण्यासाठी तुझे केवळ लीलालास्य पुरे आहे.
 (परिक्रमा) अरे, ही कोण ? नारायणदत्तेची दासी कनकलता. आपल्या पुष्ट स्तनांना गंधचूर्ग लावून, बुचड्यावर फुले माळून, हसत, टुमकत इकडे येत आहे. काय म्हणतेस ? प्रणाम करतेस ? बाळे, सजणाची जिवलग हो. तुझ्या पदन्यासाची कृपा रस्त्यावर काय म्हणून ?
 काय म्हणतेस ? असाच लोभ असावा ? सोड या फालतू अवान्तर बावी. मला सांग, चक्रवाकाची जोडी फुटली कशी?
 काय म्हणतेस ? विरहतप्त नारायणदत्ता स्नान, भोजन, अलंकाराचा त्याग करून अशोकवनात अशोकवृक्षाखाली एका शिलातलावर बसली होती ? नवचंद्रमंडळ, भ्रमर गुंजारव आणि वसंतपुष्पांच्या मादक गंधाने कठोर झालेला दक्षिण वायू ह्यांनी संतप्त अशा त्या आज्जुकेला सखीजन सान्त्वना देत होत्या ?
 तेव्हा समोरून कुणी तरी व्यक्ती कामपीडित काकली ३२ स्वरात वक्तृ आणि अपवक्तृ छंदात गीत गात बाजूने गेली. ते गीत असे- 'जो प्रियेसह वसंतात क्रीडा करीत नाही त्याचे रूपयौवन व वैभव फोल आहे.'
 'स्वच्छ चंद्र पाहून आणि कोकिळकूजन ऐकूनही जी प्रियकराची मनधरणी करीत नाही तिचे जीवन व्यर्थ आहे.'
 त्या गीताने मन शिथिल झालेल्या तुझ्या स्वामिनीने प्रियकराला संदेश पाठविला आणि त्याच्या आगमनाची वाट न पाहता स्वतःच भेटीसाठी निघाली, आणि वसंताच्या फुसलावणीने अधीर होऊन स्वामीही तिकडून निघाले तो त्यांची भेट वीणाचार्य विश्वावसुदत्त ह्यांच्या दारासमोर झाली ?
 त्या बिनसलेल्या जोडप्याला वीणाचार्यांनी घरात बोलावले १ सकाळी आज्जुका 33 म्हणाली, "सखे जा, महाराज वैशिकाचलाला बोलावून आण." तेव्हा चलावे महाराज.
 छान ! छान ! कनकलते, तु मोठी शुभवार्ता दिलीस. तुझे यौवन स्थिर असो. प्रियकराची प्रियतमा हो. तुला सतत इच्छित भोग प्राप्त होवोत. तू पुढे हो. (परिक्रमा) चला घरात घुसू.
 अरे, घाबरू नका. जोडी पक्की व स्थिर असो. वसंतऋतूने तुमचा पुन्हा संयोग केला. तसा हा ऋतू सर्वाचा संयोग करो. अहो, या वसंताने मलाही ठकविले. आता मला काय काम उरले १ माझ्या साह्याविनाच तुम्ही एकत्र आलात.

 आणि ह्यात वसंताचा तरी काय दोष ? सुंदर उद्याने, चांदण्या रात्री, सुस्वर वीणा, दूती, गोष्टी, कुतूहलाने भरलेले संवाद हे सारे असले तरी बिनसलेल्यांचे जुळतेच असे नाही. परस्परांचे खरेखुरे गुण, त्यांची ओळख पटली म्हणजे निर्माण होणारे उत्कट प्रेम हेच मीलनाचे खरे कारण.
  काय म्हणतेस ? नारायणदत्ते, तुमची प्रीतीच मी प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली

नाट्यछटेच्या निमित्ताने १५५