Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उतरविणे महाऔषधींना शक्य असते. जंगली हत्तींच्या विळख्यातून, फार काय मगरीच्या दाढेतूनही कधीकधी माणूस सुटतो, पण ह्या वेश्यारूपी वडवानलातून जिवंत सुटणेच कठीण. मित्रा, मला कडकडून भेट. तू जिवंत सुटलास हेच फार झाले.
 बरे! मला हे सांग, तुझ्या दुःखाचे मूळ कोण ? आई की लेक ? काय म्हणतोस, तो थेरडीच कुटिल आहे, आणि रतिसेनेचे तुझ्यावर प्रेम आहे ? ठीक, ठीक. रतिसेनेची व तुझी भेट करून देऊ ? तिच्याशिवाय जगणे कठीण ? ठीक, ठीक. अरे, रडू नकोस. पूस ते डोळे. आता तू जा. मी नंतर तुझा प्रश्न सोडवतो.
 काय लबाड आणि धूर्त पहा ह्या वेश्या ! दुष्ट राजे ज्याप्रमाणे सारे काही मंत्र्याच्या अंगावर ढकलून मोकळे होतात, तशा या आईवर दोष लादून मोकळ्या. आणि हा लुच्च्यांचा गुरू. तपस्वी २९ झाला तरी " प्रेम आहे " म्हणून रडतो.
(परिक्रमा ) वसंतवनातील कोकिळेप्रमाणे कोण मला बोलवीत आहे ? अरे, ही प्रियंगुसेना ! थांब, थांब आलोच. काय, प्रणाम करतेस ? पोरी, माझा आशीर्वाद घे.
 " आपल्या प्रियकराला मृदु लत्ताप्रहाराने रतिशय्येवर दूर ढकलणारी तू. त्याच्या अनावर आसक्तीत तुला घडी पडो. आपल्या पुष्ट जवनाने सुखी हो."
 पोरी, तुझ्या या थकलेल्या मांड्यांना सुगंधी तेलाची मालिश कुणी केली ? हे भद्रमुखी, अनलंकृत राजहत्तिणीसारखी शोभिवंत तू. हे तुझे स्वाभाविक रूप ज्याने पाहिले नाही, तो ठकला असेच म्हटले पाहिजे.
 मोत्यांनी भूषविलेली, नखक्षतांनी मढविलेली, अंगरागाची उटी चर्चिलेली, बावऱ्या डोळ्यांची तु. तलम वस्त्राखाली यौवनाच्या उवेने पुष्ट झालेले स्तन धारण करणारी तू. तुला पाहून तर मदनाचे मन बिथरून जाईल.
 काय म्हणतेस ? माझे बोलणे कानाला गोड वाटले ? अरे, ही खुषामत सोड आणि न लाजता मला हाक का दिलीस हे तर सांग.
 काय म्हणतेस ? भगवान अप्रतिहशासन पाटलीपुत्र सम्राटांच्या प्रासादात, पुरंदरविजय संगीतकाचा रसाभिनयासह प्रयोग होणार आहे व त्यात भूमिका करण्यासाठी देवदत्तेसह तुलाही निमंत्रण व इसार 3 • मिळाला आहे ? आणि तुझ्या या प्रगतीचे मी कारण आहे ? असे म्हणू नकोस. शरीराच्या रोमारोमातून जिथे चांदणे ओसंडते आहे, त्या पौर्णिमेच्या शोधासाठी दिवा लागत नसतो.
 बलवंतांना इतर कुणाच्या आधाराची गरजच काय ? तुझ्या प्रगतीचे कारण तूच आहेस. म्हणून तर लुब्ध रामसेन माझ्या पुढे-पुढे करतो.

 भुवया वेळावीत प्रसन्न प्रियंगुसेना लाजलेले गाल लपवण्यासाठी तोंड फिरवून हसते आहे. चला, रामसेनेला सेवेचे फळ मिळाले. काय मूर्ख आहे पहा देवदत्ता ! हिच्याशी स्पर्धा करू पाहते. रूपयौवनाची संपत्ती, चार ३१ प्रकारच्या अभिनयाच्या अभिनयाची सिद्धी. बत्तीस हस्तप्रकार, अठावीस प्रकारची दृष्टी, सहा स्थाने, तीन गीते, आठ रस, आणि नृत्तांग व लय, सारेच हिच्या आश्रयाने शोभिवंत झाले आहे. ह्या वेशात तर ही

१५४ पायवाट