Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डुलकी आली काय ?
 काय म्हणतेस, सुकुमारिके ? प्रणाम करतेस ? पोरी अविधवा व बहुपुत्रा हो.
 भुवयांचा नाच, डोळ्यांचे फडफडणे, ओठांचे मुरडणे, हातवारे आणि लचकणे. अरे ! स्त्रिया तर तुझ्या फार मागे पडल्या. अग, ही तुझी विखुरलेली मेखला दोन्ही मांड्यांवर सारखी झुलते आहे. सांग अशी अर्धपोटी तू कोणत्या ताटावरून ठलास ?
 काय म्हणतेस ? राजशालक रामसेनाच्या घरून येते आहेस ? भाग्यवान आहेस वेटा. पण सुभगे, चक्रवाकांची जोडी कशी फुटली ? काय म्हणतेस ? गणिकादासी राजलतिका हिच्या नटव्या हसण्यात आणि ललित कटाक्षांत रामसेन सापडला, त्याचे शरीर शहारले व त्याने हसून त्या लोचटीला अनुमती दाखविली ? मूर्ख वेडा  ! मग तुझा राग अगदी वाजवी आहे. काय म्हणतेस ? पाया पडला तरी तू त्याला क्षमा केली नाहीस ? त्याने सक्तीने उचलून तुला पलंगावर ठेवले तरी तू रुसवा सोडला नाहीस १ आणि मग तापलेला तो तुला तशीच होरपळत ठेवून जो त्या दासीकडे गेला, तो बरेच दिवस झाले तरी अजून परतला नाही ? अरेरे ! वाईट झाले.
 आलिंगनात जेथे स्तनांची बाधा नाही, प्रेमाला अडथळा आणणारा ऋतुकाल नाही, यौवनघात करणारा गर्भ नाही, अशी तुझ्यासारखी गुणवती रामसेनाने सोडली ? हर हर ! हे तर रतीच्या उत्सवातून निवृत्त होण्यासारखे झाले. असो. मानिनी, तू आता घरी जा. मी मित्रकार्य आटोपून येतो व तुझे मीलन घडवितो. बहिणीच्या वैभवाने माजलेल्या रामसेनाला मी पुन्हा तुझ्या पायांवर डोके ठेवण्यास आणीन. (परिक्रमा)
 चला, मोठ्या कष्टाने ह्या नमुनेदार स्त्रीच्या हातून सुटका तर झाली. अरे, हा कोण ? तू सार्थवाह पथिकाचा पुत्र धनमित्रच ना ? फार दिवसांनी भेटलास बाबा. सेवकयाचकांचा दरिद्रतारूपी अंधार दूर करणारा, युवतीचे हृदय फुलविणारा, पाटलीपुत्राच्या आकाशातील तू चंद्र. कोणत्या संकटात सापडलास ? तुला देशान्तरीच्या चोरांनी लुटले तर नाही ? राजाचा कोप तर तुझ्यावर झाला नाही ? एका डोळेझापीत कुबेराचे सर्वस्व हरण करणारा तू , जुव्यात तर फसला नाहीस ? अरे काय हे ? वाढलेले केस व नखे, मळलेले शरीर आणि कपडे, उतरलेला चेहरा, कोण्या दिव्य ऋषीमुनीच्या शापात दग्ध झाल्यासारखा का दिसतोस ? काय म्हणतोस, रामसेनेची पुत्री रतिसेना हिच्याविषयी तुझ्या मनात गाढ प्रेम निर्माण झाले आणि तिचेही तसेच गाढ प्रेम तुझ्या ठिकाणी आहे ? बरे, मग अडचण कोणती ? आपल्या लोभी आईचा लोभ अव्हेरूनही रतिसेना आपणास चिटकून राहील ही तुझी खात्री होती, म्हणून मित्र निवारण करीत असताही तुझे सर्व तू रतिसेनेकडे नेऊन ठेवलेस, आणि तिने स्नानाचे निमित्त करून साडी नेसवून तुला अशोकवनातील पुष्करणीवर नेऊन सोडले ?

 बरे मग ? तेथील रक्षकांनी चोरवाटेने तुझी सुटका केली ? ज्या नगरीत आपण वैभवाने मिरवलो, तिथे दीर्घ दारिद्रय कसे घालवावे या चिंतेत आहेस, व म्हणूनच का जातोस ? फार वाईट बाबा. अति वाईट. अतिलोभ हा वेश्यांचा स्वभाव असतो.सर्पविष

नाट्यछटेच्या निमित्ताने १५३