पान:पायवाट (Payvat).pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी षट पदार्थाचा जाणता आहे. तुझे शरीर हेच द्रव्य, तुझे रूपादी हेच गुण. तरणाशी चालू असणारी तुझी गती हेच कर्म. लोक तुझ्याशी समवाय चाहतात. इतरांच्यापेक्षा तुझ्या चवीत भेद आहे. आवडेल त्याचा भोग, नको असेल त्याच्यापासून मोक्ष. दोन्हीत तू चतुर आहेस.
 अरे ! हिने फक्त तुच्छ हसूनच प्रत्युत्तर दिले. काय म्हणता ? सांख्यमतानुसार पण २३ निर्गण, अलेप आणि क्षेत्रज्ञ असतो? वाहवा ! आपण तर माझे तोंडच बंद केले. बोलता बोलता आपण पुन्हा आतुर झाल्यासारख्या दिसता. आपण गमन २४ करावे. तरुणांच्या रतीत विघ्न नको. मीही चलतो. (परिक्रमा)
 अरे, ही चरणदासीची आई रामसेना, वयस्क असूनही अजून नवतरुणीसारखी लचकत येत आहे. तारुण्यात सर्व भोग भोगून, आपल्या प्रियकराचे द्रव्य हरण करून, तरुणपणी तरुणांच्या आपापसातील मारटोकीचे कारण बन्न कृतकृत्य झालेली ही, हिला पुन्हा विस्मय कशाचा वाटला ?
 हाय ! तरुण कामीजनांचे मरणच अशी ही घाटीपार २५ प्रौढा, आता मुलीच्या प्रियकरांचे द्रव्य दोहन करण्यासाठी जात आहे. या वठलेल्या नवऱ्याची थोडी चाचपणी करू या.
 कामीजनांच्या महावज्राला नमन असो. हे अल्लडे ! रामसेने! आपल्या पोरीला गलाल २६ भरून झाल्यानंतर आता कुणाचे घरटे उजाड करण्यासाठी जात आहेस ?
 काय म्हणतेस, माझेच चरित्र मला छळीत आहे १ सोड ही थापेबाजी. नेम कुणावर धरला तेवढे सांग. काय म्हणतेस ? तुझी पोरगी चरणदासी जी धनिकांच्या घरी गेली ती तेथेच राहिली आहे ? तिला संगीतकाच्या निमित्ताने परत आणावयाचे आहे ? अग, तुला खरे सांगू? ही पोरीची गफलत आहे. कामुकांची सर्वप्रकारे पिळवणूक करणाऱ्या व सार चोखून चोयटी कुशलपणे फेकणाऱ्या चतुर आईची ती लेक. आणि ती शास्त्रात इतकी अधू असावी ना ?
 एकदा जो गमनभोग्य होता, त्याचा साठा उपसून घ्यावा व सुट्टी २७ सांगावी, हे सोडून रुतून बसली; त्याच्या रितेपणात फसली. अशा पोरीला शास्त्र तरी काय शिकवावे ?
 काय म्हणतेस? मी चरणदासीला उपदेश करू ? ठीक आहे. पण थोडा मित्रकार्यात गुंतलो आहे. ते आटोपून येतो. आता तू जा. (परिक्रमा)
 खरोखर वेश्या कधी भरवशाच्या नसतात. ह्या निर्दय आणि लोभी वारांगना, आत्मा जसा शरीर सोडतो, त्याप्रमाणे सार संपल्यावर जुना यार सोडतात. आणि काकु, या संकटावर औषध नाही; गणिकारूपी शस्त्र वापरण्यात कुशल असणाऱ्या ह्या घाटीपार मातांचा ईश्वर सत्यानाश करो.

 अरे, आले. न टळणारे संकट अकल्पित आले. ही राजमार्गातील २८ कलहिनी नावाची सुकुमारिका, नपुंसका इकडे कोठे येत आहे ? चला, तोंडावर उपरणे घेऊन झटका. पण हाय ! ही माझ्याकडे येत आहे. काय होणार माझे ? बापा यमराजा, तुला

१५२ पायवाट