पान:पायवाट (Payvat).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गळणाऱ्या घराची चिंता; जेव्हा हिवाळा येतो तेव्हा प्रावरणांच्या टंचाईची चिंता, आणि जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा पायाचे तळवे होरपळणार याचीच चिंता! या चिंतेतच सगळा जन्म जायचा काय ? या चिंतेतून मुक्त होऊन मुलाकडे फूल म्हणून पाहता येणे, डोळ्यांकडे डोळे म्हणून पाहता येणे कधीतरी आवश्यक नाही काय ? प्रत्येक सौंदर्याला एका प्रयोजनातच गुरफटणे भाग आहे काय ? रतीकडे निर्मितीची पूर्वअवस्था म्हणूनच पाहायचे काय ? जीवनाचा कोणताही क्षण मागच्या पुढच्या संदर्भातून वेगळा न करणे हे उचित आहे काय ? यांतील औचित्याच्या प्रश्नाचे उत्तर हे प्रत्येकाने आपल्या अभिरुचीप्रमाणे निराळे दिले पाहिजे. पण हे घडणे अपरिहार्य असते. ज्यांचे अस्तित्व वाहत चाललेले असते, त्यांना काठ हवा असतो. ज्यांचे अस्तित्व गाळात रुतलेले असते, त्यांना मोकळीक हवी असते. ज्यांची लढाई सांस्कृतिक पातळीवर चाललेली असते, ते संवेदनक्षमतेचा विकास करीत प्रत्येक क्षणाचे वेगळेपण आणि अपूर्वत्व टिकविण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्यासाठी केसांचे काळेपण भुंग्यांच्या काळेपणापेक्षा निराळे असते. पण ज्यांची लढाईच जगण्यासाठी चाललेली असते, ते आपले अस्तित्वच टिकविण्याच्या प्रयत्नात उभे असतात. त्यांच्यासाठी सगळे रंग सारखेच फिके असतात. भाकरीचा एकच रंग इंद्रधनुष्यापेक्षा लोभस असतो. या संघर्षात जे गुंतलेले असतात, त्यांच्या भावनेतही जिवंत असा आवेग असतो. या कवितेत प्रतिक्रियांना एक उत्कटता असते. पण सगळ मागच्या-पुढच्या संदर्भात रुतलेले असते. असल्या प्रकारचे जीवन जगणारा कवी 'बोटांची पावले केसांच्या कडेवरून घसरतात आणि बोटांचे चवडे तोल सावरताना थकून जातात' या भाषेत केस पाहत नसतो. त्याच्यासाठी सगळाच केशसंभार थकलेला शीण उतरून ठेवण्यासाठी एक खुंटी असते.

 अशा कवितेत रती ही निर्मितीसाठी असते, आणि प्रीतीची कसोटी एकमेकांचा तोल सावरून चिखलातून काठापर्यंत जाण्याच्या धडपडीतून निर्माण होते. म्हणून प्रेयसा ही या कवितेत सुख उल्लसित करीत नाही. ते तिचे गौण काम असते. अश्रू वाटून घण हे प्रीतीचे मुख्य काम असते. जेव्हा कवी गलबलून जातो, तेव्हा या पवित्र कुशीचा त्याला आसरा असतो. तिचे केस विरंगुळा असतो. तिची बोटे आपल्या केसांतून फिरत आहेत, हेच आश्वासन असते. दिवसभराची थकलेली अशी ती याला सावरताना चैत्रपालवी होते. कारण तिलाही स्वतःचा थकवा असतोच. पदराने घाम टिपताना तिच प्रेम दिसू लागते. हा आधारच फक्त या नागव्या जगात वावरताना कवीला जिवंत ठेवीत असतो. म्हणून स्वतःवर असणारा तिचा विश्वास टिकवून ठेवणे हे जीवनातल एक महान कर्तव्य होऊन बसते. आपल्याविषयी वाटलीच तर तिने घृणा ठेवावी, पण सगळ आयुष्य घृणेत संपणार नाही हा विश्वास तिने गमावू नये, याची धडपड सुरू होते. वादळात तिचा पदर शीड होतो. गोठुन गेल्यावर तिचा हातच आश्वासक होतो. तिने डोळ्यांत जहर साठवीत आपल्याकडे पाहू नये, ही एकच अशावेळी आकाक्षा असते. या सखीलाही वैताग असतो. कोसळणाऱ्या विजेप्रमाणे तिलाही काही ओकून

१३६ पायवाट