कोंडलेला होता. पलिकडच्या आखीव रस्त्यावर बुटके उजेड होते. अंधारापेक्षाही तुच्छ व क्षुद्र असे उजेड,- या उजेडांचा पहारा होता. आपल्या आत्म्याशी आम्ही बोलू नये म्हणून हे पहारे उभे होते. केव्हा हा उजेड विझला म्हणजे आम्ही त्या अंधारात आत्म्याबरोबर फिरत असू. कधी बुटक्या उजेडाची नजर चुकवून आत्म्याशी चर्चा करीत असू . हा फुटपाथवर उभा असणारा पहारेकरी बुटका उजेड फक्त दोनच गोष्टी सांगणार : पहिली गोष्ट म्हणजे आहे त्याच्याशी जुळते घे. दुसरी गोष्ट म्हणजे बेतलेल्या रस्त्याने जाऊन बेतलेला स्वर्ग मिळव. जो उजेड अंधाराचा विध्वंस करीत येत नाही, तो उजेड जो प्रकाश दाखवितो तो प्रकाश अंधाराबाहेर पडण्याचा नसतो; अंधारातच स्वतःला एक सुरक्षित जागा मिळविण्याचा असतो. ही जागा मिळवायची असेल तर स्वतःचा शोध थांबवणे, आत्म्याशी वेइमान होणे, कुणाच्यातरी आश्रयाखाली जाऊन स्थिरावणे आवश्यक होते; तशी संधीही आली होती. जीवनात स्वतःशी अप्रामाणिक होण्याची आमंत्रणे नेहमीच येतात. इमान विकत घेणारीदुकाने चव्हाट्या-चव्हाट्यावर असतात. ह्या दुकानांकडे जी वाट घेऊन जाते, ती बुटक्या प्रकाशाची वाट असून तो वेइमान उजेड आहे. एक छोटीशी दिवलाणी असेल, तिच्यात लहान वात असेल, ती झंझावातात विझण्याच्या वेतात आली असेल, पण ह्याही ठिकाणी आम्ही स्वतःला सावरले. ही वातही सावरली. सुर्व्यांच्या कवितेतील कवीची कहाणी ही अशी व्यथेची कहाणी आहे. या संदर्भात त्यांच्या टीकाकारांना न आवडलेल्या, पक्षीय वाटलेल्या कविता समजून घ्याव्या लागतील.
वर ज्या पद्धतीने या कवितांच्याकडे पाहिले आहे, तो त्या कवितांचा अर्थ काही मी सुर्व्यांना विचारून ठरवलेला नाही. कविता करण्याचा हक्कदार कवी असला तरी कवितेचा अर्थ सांगण्याचा हक्कदार कवी नसतो. तो अधिकार रसिकांचा आहे. आस्थेवाईक वाचकांचा असतो. जो अर्थ वाचकांना त्या कवितेच्या रसग्रहणात जाणवतो तोच त्या कवितेचा अर्थ म्हटला पाहिजे. म्हणून हा अर्थ शोधण्यासाठी रसिकांच्याजवळ पूर्वग्रह नसलेल्या दृष्टीची गरज असते. एकदा कवी कम्युनिस्ट आहे असे म्हटले की त्या जाणिवेतून प्रत्येक कवितेचा तिच्या रचनेत न मावणारा अर्थ वाचकांना जाणवू लागतो. जे तलवारीचे आहे तसेच मुटी वळण्याचे आहे. सुर्वे यांच्यामधील माणूस कामगार-पुढाऱ्याप्रमाणे मी कामगार आहे, मी तळपती तलवार आहे, आणि म्हणून सारस्वताच्या क्षेत्रात शिरण्याचा थोडासा गुन्हा करणार आहे असे किंचाळत असतो. आपण या क्षेत्रातील नव्हत. इथे येण्याचा आपल्याला हक्क नाही. तरी नाइलाज म्हणून तो या क्षेत्रात उभा असतो. हा पार्टीचा सदस्य ज्या अर्थाने तलवार हा शब्द वापरतो, त्या अर्थाने सुर्वे यांच्यामधील कवी तलवार शब्द वापरीत नाही. जसा घोटाळा तलवारीबद्दल झाला आहे, तसाच घोटाळा मुठी वळण्याबद्दल झाला आहे. मूठ वळलेला हात ही पक्षाची अभिवादनाची पद्धत आहे. म्हणून सुर्व्यांच्या कवितेत कुटे मूट वळलेला हात दिसला की लगेच वाचकांना पार्टी दिसू लागते. त्यामुळे या कवीला आपल्या प्रेयसीसमोर मूठ वळवलेला हात धरून यात मी काय आणले आहे ते ओळख , असे म्हणण्याचीसुद्धा चोरी झाली आहे. अतिरेकी कावीळ झाली
पान:पायवाट (Payvat).pdf/126
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२० पायवाट