पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ पानसे घराण्याचा इतिहास. कोल्हापूरकरांनी पुन्हा शके १६९८ च्या पोषांत दंगल चालविली, व चिकोडीचे ठाणे घेऊन मनोळीवर स्वारी केली. तेव्हां रामचंद्र गणेश व कृष्णराव पानसे यांना पेशवे सरकारांनी त्यांच्या समाचाराकरितां पाठविले. वडगांवाजवळ उभय पक्षांत लढाई होऊन करवीरकरांची माघ वद्य सप्तमीस मोड झाली व पेशव्यांच्या सैन्यास बरीच लूट सांपडली. तेव्हा कोल्हापूरकर महाराज पन्हाळ्यास पळून गेले. नंतर पेशव्यांच्या सैन्यांनी एकदम कोल्हापुरास जाऊन शहरास वेढा दिला. दोन दिवस कृष्णराव पानशांनी तोफांचा जबर मारा करून, शहरांतल आदितवार पेठ लुटली. तेथे शंकराचार्यांचा एक मठ होता, त्यांत पुष्कळ ब्राह्मण आपलें वित्त घेऊन राहिले होते. लष्करचे पेंढारी मठाच्या आसपास गेल्यावर, मठांतून त्यांच्यावर गोळ्या आल्या. ते निमित्त ठेवून, पेंढा-यांनी मठांत शिरून दरोबस्त मठ लुटला. पुढे गांवांतील ब्राह्मशांच्या विनंतीस मान देऊन कृष्णरावांनी तोफा बंद केल्या व ते कागलाकडे वळले. नंतर कागल, चिकोडी, एकसंबे, भोज वगैरे ठाणीं कृष्णराव पानसे यांनी काबीज केली. कोल्हापूरच्या वरील लुटींत, शंकराचार्यांचे एक पाचेचे चंद्रमौळीश्वराचे नित्य पूजेचे लिंग होते, ते पटवर्धनांस मिळाले. हल्लीं, ते जमखिंडीकरांकडे आहे. तसेच एक गोपाळकृष्णाची मूर्ति कृष्णराव पानसे यांना सांपडली. ती सांप्रत, गणपतराव दामोदर पानसे ( कलेक्टर ) यांच्या देव्हा-यांत आहे. ही मूर्ति या घराण्यांत कोल्हापूरच्या बरील लुटीत मिळाली अशी आख्यायिका वृद्धमुखांतून परंपरेने चालत आलेली आहे.