पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पांचवें. -- - १. भिवराव यांची तोतयावर रवानगी. - श्री. दादासाहेबांनी पुरंदरच्या तहांत स्वस्थ बसावयाचे कबूल केले होते, आणि इंग्रजांनीं हि त्यांना आश्रय देऊं नये असे ठरले होते. परंतु, आपण “ बारभाईच्या ) हातीं सांपडलों तर ते आपला जीव घेतील असा दादांनी बहाणा केला. इंग्रजांना हि दादासाहेब आपल्या बगलेत पाहिजे च होते; म्हणून त्यांनी त्यांना सुरतेत दोन शें लोकांनिशी ठेवून घेतले. तेथे राहून स्वस्थ वाटेना, म्हणून सुरतेजवळ अश्विनकुमार येथे स्नानास जात असा बहाणा करून, दादासाहेब बाहेर पडले ते थेट दमण येथे पोर्तुगीजांकडे आश्रयार्थ आले. आतां, इंग्रजांची आपल्याला उघड उघड मदत मिळणे कठिण, असे जाणून दमणास आल्यावर त्यांनी तेथील अधिका-यामार्फत गोव्याच्या गव्हर्नराशीं बोलणे लाविलें कीं, आम्हांस तुमच्या मुलुखांत जागा द्या, नाही तर, जळमार्गे हैदराकडे पोहोचवून द्या. ही बातमी पुण्यास कळतांच बारभाईनी, पुण्यास असलेल्या फिरंग्यांच्या वकिलास तंवी दिली. त्याने गोंव्यास ही हकीकत कळविल्यावरून, तेथील गव्हर्नरने दादासाहेबांस साफ कळविलें कीं, परवडत असेल तर, तुम्हीं फक्त पंचवीस माणसांनिशी दमाच्या किल्यांत राहावे. या व्यतिरिक्त आम्ही तुम्हांस कोणती हि मदत करण्यास तयार नाही. हे ऐकून श्रीमंत निराश होऊन परत मुंबईस येऊन तेथेच राहिले; आणि त्यांचे दत्तक पुत्र अमृतराव हे दोन तीन हजार फौज, इतर लवाजमा व तोफा घेऊन तारापुरच्या ठाण्यांत आश्रयास राहिले. त्यांची उपेक्षा करणे धोक्याचे असल्यामुळे त्यांच्या बंदोबस्तास बारभाईंनी भिवराव पानसे हे या वेळीं तोतयाचे प्रकरण आटोपून मोकळे झाले होते त्यांची तिकडे रवानगी केली ( शके १६९८ कार्तिक ). परंतु, भिवराव येत आहेत असे ऐकून, ते येण्यापूर्वीच अमृतराव हे सडे तारापुराहून निघून मुंबईस जाऊन राहिले. त्यांची फौज व तोफा वगैरे सर्व सामान तारापुरच्या ठाण्यांत होते, ते भिवरावांनीं तारापुरास वेढा घालून आपले स्वाधीन करून घेतलें ( मार्गशीर्ष ) व बेलापुराजवळ येऊन तळ दिला ( खरे ऐ. ले. सं. २७३४ ). - या पूर्वीच तोतयाचे प्रकरण उद्भवले होते. श्री. सदाशिवराव भाऊसाहेब पानपतावर मृत्यु पावले ही गोष्ट खरी असतां, कांही दिवसांनीं, एका छत्रपुराकडील कनोजानें कांहीं मराठ्यांच्या साहाय्याने आपण च भाऊसाहेब आहोत म्हणून जाहीर केलें आणि फौज जमा करण्यास प्रारंभ केला. या कनोजाचें नांव सुखलाल असे असून, त्याच्या व भाऊसाहेबांच्या चेह-यांत बरेच साम्य होते. असल्या खुळास केव्हां हि