पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण चौथे समेटाचे फिसकटलें व इंग्रजांची मदत घेण्यास दादा गुजराथेकडे वळले. अर्थात् सरकारी फौज हरिपंतांच्या हातांखाली होती. ती हि त्यांच्या पाठीवर निघाली (शके १६९६ पौष ). या फौजेत पटवर्धन, रास्ते, पानसे व हुजरात यांची फौज मुख्य होती आणि मुख्यतः या च फौजेच्या बळावर हरिपंतांनी इंग्रज व दादासाहेब यांना तोंड देऊन त्यांचा पराभव केला. दादांचा साथी गोविंदराव गायकवाड नडियादकडे पळाला होता त्याचे वर हरिपंत तात्यांनीं, आप्पा बळवंत, आनंदराव गोपाळ, मलबा पानसे यांना रवाना केले. ही गोष्ट शके १६९६ च्या फाल्गुनांत झाली. यावरून, या वेळीं मलबा हे सर्वखीं बारभाईंच्या बाजूस होते हैं स्पष्ट ठरते. तिकडे महीच्या कांठीं तात्यांनी दादासाहेबांचा चांगलाच मोड केला ( माघ वद्य २ ). तेव्हां भटकत भटकत दादासाहेब सुरतेस गेले. तेथे इंग्रजांनी दादापासून आपल्या फायद्याचे असे बरेच करार करून घेऊन, त्यांचे मदतीस कर्नल कीटिंग व त्याच्या हाताखालीं तीन हजार फौज व पंधरा वीस तोफा कायमच्या दिल्या. कीटिंग याची इच्छा, मराठ्यांनी आपल्यास बिलगावें व मग आपण तोफांनीं त्यांना भाजून काढावे अशी होती. पण तात्या फार धूर्त होते. आपली माणसे त्यांना विनाकारण मारावयाची नव्हती, म्हणून ते सहसा कटिंगच्या फौजेवर हल्ले न चढवितां हटकून दादांच्या फौजेशी बिलगत असत. पण त्याचा अर्थ भलता च करून कीटिंग याने फुशारकी मारली की, तात्या आपल्यास भितात. पण ही त्याची घमेंड शके १६९७ वैशाख वद्य चतुर्थीस तात्यांनी चांगली च जिरविली. दादा व कीटिंग है। या दिवशी नापार येथून कूच करून निघाले. एक कोस जातात, न जातात, तो त्यांच्या पिछाडीवर एका झाडीतून तोफखान्याचा भडीमार सुरू झाला. त्यावर मराठ्यांनी जोराचा हल्ला करून थेट इंग्रजांचे गोरे लष्कर होते, तेथपर्यंत मारामार करून इंग्रजी-फौज कापून काढली व त्यांच्या दोन तोफा फोडून टाकल्या. या लढाईत मराठ्यांनी गोरे आफिसर व सोजीर तीनशेपर्यंत कापून काढले. दादांच्या कडील हि पुष्कळ माणसे मारली गेली व बरीच जखमी झाली. तात्या कडील राजश्री जयवंतराव पानसे यांस गोळी लागली. * इजा फार आहे. खैर होईलसे वाटते ” ( कित्ता २३१९ ). सारांश इंग्रजांचा रेच चांगला च मोडला. या नंतर पावसाळा सुरू झाल्यामुळे मलबा पानसे सोनगडास छावणी देऊन राहिले. बारभाई यांचेवर वरील संकट आले असतां इकडे त्यांचे शत्रु करवीरकर, कित्तरकर हैदर वगैरे सर्वांनीं च एकदम उचल केली. तेव्हां कोल्हापूरकरावर कोन्हेरराव पटवर्धन यांस प्रथम पाठविले व त्यांच्या मदतीस कृष्णराव पानसे याजबरोबर तोफा देऊन त्यांस तिकडे रवाना केले. अनेक अडचणीमुळे ही मोहीम फायदेशीर रीतीनें । पार पडली नाहीं. कृष्णरावांनी तोफांच्या मान्यांनी या वेळी कित्तूरकरांचे बंड पार मोडून टाकले. इंग्रजांनी या खळबळींत आपला कांहीं च फायदा होत नाही असे पाहून पुरंदर येथे शके १६९७ फाल्गुनांत बारभाईशी तह केला.