पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० पानसे घराण्याचा इतिहास. प्रमाणे च मलबा पानसे हे दादासाहेबांच्या मर्जीतील असावेत. पुन्हा, एके ठिकाणी असे लिहिले आहे की, * फौजेच्या बोलाचालीचा अखत्यार राजश्री सखाराम हरि वर आहे. राजश्री मलबा हि उगी च जवळ असतात " ( कित्ता २०५३ ). निझामावर जाण्यापूर्वी इंग्रजांनी * घाटाखालीं वसई वगैरे प्रांतीं उपद्रव करावयाचा मनसुवा केला आहे, याज करितां कांहीं फौज व गारदी सामान देऊन राजश्री मलवा पानसे यास पाठविणार आहेत ( कित्ता २०५८ ). मलबा यांस अशा कामगिरीवर पाठविण्याच्या योजनेवरून ते मनापासून कोणाकडे असावेत हे नीट समजते. बाहेरून जरी दादासाहेबाकडे त्यांचे वसण उठणे असे तरी त्यांचा ओढा वाराभाईकडे होता. हे यावरून सिद्ध होते. ही गोष्ट शके १६९५ च्या आश्विनांतील होती. निझामावरील स्वारींत पानसे मंडळी होती. या सालच्या कार्तिकांत तोफखाना वाटेंत च येऊन मिळाला. बारभाईचे कारस्थान उभारतांना सखाराम बापूंनी पटवर्धनाच्या वकिलास सांगितले होते की, “ देशस्थ मंडळी हि सर्व आमच्या लगामी च आहेत ' ( कित्ता २०८९ ). यावरून पानसे मंडळी वारभाईंना अनुकूल होती हे उघड दिसते. निझामास वेदर किल्लयांत कोंडल्याचे वृत्त वर आलें च आहे. या वेळी पेशव्यांकडे दोन शें तोफा होत्या व मुख्यतः या तोफांच्या जबर मा-याने च निझाम त्या वेळीं शरण आला. | पूर्वी सांगितल्याप्रमाणे बारभाईनी दादासाहेबांवर फौज पाठविण्याचे ठरवून त्र्यंबक राव मामास सेनापति नेमिलें. मामांनी, भोसले, निझाम वगैरेंना मिळवून दादासाहेबाकडे रोख वळविला. या सर्व गोष्टी दादासाहेबांना समजल्यावर त्यांनी हैदरावरील स्वारी तशी च सोडून आपला हि रोख मामांच्या बाजूस फिरविला. त्या वेळेस राजश्री भिवराव पानसे दिमत तोफखाना व गोपाळ नाईक तांबेकर यांस, संधानासाठी श्रीमंतांनी रवाना केलें. इकडे दादांच्या सैन्यांत असलेले पटवर्धनादि जे सरदार बारभाईंना मिळाले होते, त्यांना नाइलाज जाणून सामोपचाराने कांहीं तरी निमित्ताने दादासाहेबांनी देशी परत लावून दिले. पुढे दादासाहेब व बारभाईंचे सेनापति त्र्यंबकराव मामा यांची लढाई पंढरपूरनजीक कासेगांव गोपाळपुरावर झाली. तींत मामा जखमी होऊन शत्रूचे हातांत सांपडले, ते दुसरे दिवशीं वारले. लढाई सुरू होण्यापूर्वी दादांनीं कृष्णराव पानसे तोफखान्यांच्या नांवची चिठ्ठी पाठविली की, “संधान केल्यास उभय पक्षीं बरें.” परंतु समेटाची बोलणी सुरू होण्यापूर्वी च लढाईस तोंड लागले. मामा हातीं सांपडल्यामुळे दादासाहेबांस हुरूप आला. पुढे मामांच्या जागेवर हरिपत तात्या नेमले गेले व त्यांनी दादांचा सारखा पिच्छा पुरविला. तात्यांच्या बरोबर निझाम व भोसले होते च. इतक्यांत श्रीमंत सवाई माधवरावसाहेब यांचा जन्म झाला (शके १६९६ अधिक वैशाख शुद्ध सप्तमी ). तेव्हां दादासाहेबांनी समेटाचे बोलणे लाविलें. तथापि, दादांच्या इतर खटपटी वे कारस्थाने आंतून सुरू च होती. अखेर,