पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण चौथे । ५९. तोफा डागू नका असा सल्ला मुत्सद्यांनी दिला. या कारणामुळे पानसे यांनी तोफा परत काढून घेतल्या. यावरून स्पष्ट दिसते कीं पानसे मंडळींचा या कटांश बिलकूल संबंध नव्हता. | श्री. दादासाहेब गादीवर आल्यानंतर काही दिवसांनी “ बारभाईचे कारस्थान " उभारले गेले. या कारस्थानाचे मुख्य सूत्रचालक बापू व नाना हे असून, त्यांना मोरोवा फडणीस, त्र्यंबकराव मामा, हरिपंत फडके, रास्ते, पटवर्धन, धायगुडे, कृष्णराव काळे, नारो आप्पाजी, बाबूजी नाईक, भिवराव पानसे व मल्हारराव पानसे यांची मदत होती. कारस्थानांत असे ठरलें कीं, श्री. मातुश्री गंगाबाईसाहेब राज्याच्या मालक, बापू मुख्य कारभारी, नाना दुय्यम कारभारी व त्र्यंबकराव मामा मुख्य सेनापति असे व्हावे आणि श्री. दादासाहेब यांना पदच्युत करावे. ही मसलत सिद्धीस जाण्यासाठी प्रथम दादासाहेबांना पुण्याहून दूर काढणे जरूर होते. त्याच सुमारास निझामाने मराठी राज्याविरुद्ध खटपटी चालविल्यामुळे दादासाहेबांनी प्रथम त्याच्यावर स्वारी करण्याची तयारी केली. ते बरोवर बरीच फौज घेऊन तिकडे निघाले. अर्थात् बारभाईना पाहिजे होती ती सांध यामुळे आपोआपच लाभली. दादासाहेबांबरोबर जी सरदार मंडळी होती, तींत नाना, बापू, विनिवाले, त्र्यंबकराव मामा, आप्पा बळवंत, भवानराब प्रतिनिधि वगैरे सरदार असून भिवराव पानसे हि होते. निझामाच्या प्रदेशाची नासाडी करून दादासाहेबांनी खुद्द निझामास बेदरच्या किल्लयांत कोंडले, तेव्हां निरुपायानें तो शरण आला; हे काम आटोपून दादासाहेब हे दक्षिणेत हैदराकडे वळले. या दरम्यान बापू, नाना, मोरोबा, हरिपंत तात्या हे कांहीं ना कांहीं तरी एकेक सवव सांगून श्रीमंतांच्या फौजेतून निसटून परत पुण्यास आले आणि प्रसिद्ध अशा “ बारभाईच्या कारस्थानास ” त्यांनी हात घातला. नारो आप्पाजीने पुणे शहर ताब्यात घेतले व श्री. मातुश्री गंगाबाईसाहेब व श्री. मातुश्री पार्वतीबाई साहेव यांना पुरंदर किल्लयावर नेऊन ठेविलें; दादासाहेबांच्या पक्षपाती लोकांच्या घरादारांच्या जप्त्या केल्या. नाना व बापू यांनी छत्रपतींकडून दादासाहेब यांना पदच्युत करविले आणि पेशवाईची वस्त्रे श्री. गंगाबाई साहेबांच्या नांवें व कारभाराची वस्त्रे आपल्या नांवे आणविली. निझाम ( अल्ली ) यास व साबाजी भोसल्यास त्यांनी आपल्याकडे ओढले. याप्रमाणे कारस्थान रगतां च कारभा-यांनी दादासाहेबांस बंडखोर ठरविले हैं वर्तमान दादासाहेबांस समजल्यावर त्यांचे डोळे उघडले; पण ते फार उशिरा उघडले. त्यांनी लगेच हैदरावरील स्वारी सोडून आपला मोर्चा पुण्याकडे फिरविला. त्यांनी या स्वारीपूर्वी जी फौज जमा केली होती, त्या * फौजेचा कारभार सखाराम हरि, मलबा पानसे व बाजीपंत अण्णा या त्रिवर्गास सांगितला होता (ऐ. ले. सं. पृ. २०३९ ). यावरून असे वाटते की, सखाराम हरि व बाजीपंत अण्णा यांच्या