पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ पानसे घराण्याचा इतिहास. सांगितले की, “महंमद यूसफ नांवाचा गारदी हा सुमेरसिंगाचा परम स्नेही होता. तो या कटांत होता व त्याने माझे मन वळवून मला कटांत गोविलें. कटांत सर्व मिळून सतरा माणसे प्रमुख होती व त्यांत च “तोफखाना आमचे कडेस आहे' असे सांगणारा एक मनुष्य होता. यावरून सकृद्दर्शन असे दिसते की, तोफखानेवाले पानशांपैकी कोणी तरी या कटांत असावा. परंतु, त्यास प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष असा कसलाच पुरावा मिळत नाही. शिवाय, येथे हेहि लक्षांत घ्यावयास पाहिजे की, मूळ कट जो झाला तो श्रीनारायणरावसाहेब यांस धरून कैदेत ठेवावे व श्रीमंत दादासाहेव यांस गादीवर बसवावे, या दोन गोष्टी साधण्यासाठींच झाला; आणि मूळ कटांत भवानराव प्रतिनिधि, मोरोवादादा फडणीस, सदाशिव रामचंद्र, चिंतो विठ्ठल वगैरे मोठे सरदार व खुद्द श्रीमंत दादासाहेब हे होते; पण, श्रीमंतांना मारावे असा जो कट नवीन उत्पन्न झाला, तो निराळ्याच लोकांचा असून तो आयत्या वेळी व अत्यंत गुप्तपणे उभारला गेला आणि त्यांची दखलगिरी वर सांगितलेल्या मंडळीला नव्हती. एवढे च नव्हे तर खुद्द श्रीमंत दादासाहेबांना हि नव्हती. हा दुसरा कट वायका, आणि दुष्ट व मतलबी लोक यांचा असावा. महंमद यूसफ वगैरेंची बारीक चौकशी करून हरिपंत तात्या फडके यांनी नाना ( फडणिसां ) ना जी हकीकत सादर केली त्यांत त्यांनी आपले असे च मत प्रदर्शित केले आहे. मोरोबा दादा यांच्या सतराशे पुतळ्या व सदाशिव रामचंद्र यांजकडील एक हजार मोहरा कटवाल्या पुढारी मंडळीकडे आल्या होत्या, त्यांचा विनियोग गारद्यांना अनुकूल करून घेण्याकडे झाला होता असे शावित झालें. सारांश, मोठा कट ( म्हणजे * श्रीमंतांना धरावे' हा ) निराळा व धाकटा कट ( म्हणजे * श्रीमंतांना मारावे' हा ) निखालस निराळा होता. पुढे म्हणजे श्री. दादा- . साहेब गादीवर आल्या वेळी त्यांच्या फौजेत मल्हारराव ऊर्फ मलवा पानसे हे होते असे आढळते; पण इतर मंडळीप्रमाणे ते वाह्यात्कारी होते. त्या वरून एवढेच फार तर ठरेल की, मोठ्या कटांत ज्याप्रमाणे ( वर नांवें सांगितलेली ) काही मंडळी होती, त्याप्रमाणे कदाचित् मल्हारराव हे ही एक असतील. धाकट्या कटांशी त्यांचा किंवा दुस-या कोणत्या हि पानशांचा निश्चयें करून बिलकूल संबंध नव्हता, व तसा दुरून वास येण्याजोगा यत्किंचित् हि पुरावा आढळत नाहीं, असो. श्रीमंतांचा वध शके १६९५ भाद्रपद शुद्ध त्रयोदशीस झाला. फाजल व खरकसिंग या दोन गारद्यांच्या इष्टेटी पुढे सरकार जमा करण्यांत आल्या, हे काम भिवराव पानशाकडे सोपविण्यांत आले होते. अर्थात् या गोष्टीवरून हि आमच्या वरील म्हणण्यास आधार मिळतो. शिवाय श्रीमंतांच्या वधानंतर तमाम मुत्सद्दी केतवाल चावडीवर जमा होऊन पुढे काय करावे याबद्दल विचार करू लागले. तेव्हां भिवराव पानसे यांनी तोफखान्यांतून शिड्या व तोफा शनवार वाड्याजवळ आणून तटास शिड्या लावल्या व वाड्याचा तट तोफांनी उडवून देऊन आंतील गारदी पकडण्याचा मनसुबा केला. पण वाड्यांत पार्वतीबाईसाहेब, गंगाबाईसाहेब, सगुणाबाईसाहेव वगैरे खाशी मंडळी असल्याने