पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण चौथे. प्रकरण ५७ ( म्हणजे इनामें, बक्षिसे वगैरे ) देऊन सर्वाना संतोषित केले व आपल्या पश्चात् राज्यकारभार कसा करावयाचा ते हि सर्वानुमते ठरविले. मलबावर श्रीमंतांची इतकी मर्जी होती की, “ या दुखण्यांत राज्यकारभाराच्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर जेथे खुद्द श्रीमंतांच्या मखलाशां ( मंजुरीचे शेरे ) व्हावयाच्या असत तेथे त्या श्री. नारायणरावसाहेब यांच्या हातून करवून वरकड ( सर्व काम ) राजश्री मलबा पानसे व ( महादाजीपंत ) गुरुजी यांजकडून करावतात. " ( खरे ऐ. ले. सं. पृ. १९०२ ) कार्तिक शुद्ध द्वादशीस श्रीमंतांनी सर्व प्रायश्चित घेतले. कार्तिक वद्य अष्टमी बुधवारी तोंडाने * गजानन, गजानन ” असे म्हणत म्हणत श्रीमंत कैलासवासी झाले ! या वरील प्रसंगापूर्वी पानशांनीं मौजे सावरदरी ( तालुका खेड जि. पुणे) येथे एक व्यापारी पेठ बसविली ( शके १६८५ ). तेव्हां सरकारने, त्या पेठेत व्यापारी, उदमी वगैरे लोकांनी येऊन व्यापार सुरू करावा, दुकानें घालावी, या बाबद त्यांच्यापासून सरकार नेहमीं जो कर घेई तो पांच वर्षे माफ केला ( परिशिष्ट क्रमांक १४ पहा ). जेजुरी येथील गांवचे व यात्रेचे शेटेपण, मानपान, इनाम जमीन व वाडा वगैरे पूर्वीपासून धनवडे यांचा होता. शके १६९३ च्या सुमारास या घराण्यांत हैबती बीन खंडोजी धनवडे म्हणून एक पुरुष झाला. त्याच्याशी वाद घालण्यासाठी या वेळी दुसरा एक प्रतिस्पर्धी उभा राहिला. त्या भांडणांत हैबतीस फार खर्च आला, तो त्याच्या आहाराच्या बाहेर गेल्याने त्याने आपले निम्में वतन शके १६९३ वैशाख शुद्ध त्रयोदशीस, लक्ष्मण चिंतामण धडफळे, पाषाण गांवचे पाटील यांस पांच शें रुपयांस विकले. पुढे, म्हणजे शके १६९५ विजयनाम संवत्सरे आषाढ शुद्ध दशमीस धडफळे यांनी ते निम्में वतन, कृष्णाजी माधवराव, भिवराव यशवंत, सखाराम यशवंत, विश्वासराव यशवंत, पुरुषोत्तम यशवंत व व्यंकटराव केशव पानसे यांस पंधरा शें रुपयांस विकत दिले. त्यांत शेटेपणाच्या अर्ध्या वतनाच्या वृत्तीखेरीज, इनाम अर्धा जमन ३७॥ बिघे होती. मानापमानांत, शिराळ शेटाच्या दिवशी शिरपाव, चांभाराकड़न दरसाल एक जोडा, लग्नाच्या वेळी प्रथम गंध लावण्याचा व विडा घेण्याचा वगैरे मान होते. गेल्या पन्नास वर्षांखालीं पानशांनी ही वृत्ति विकून टाकिली; सध्या पानशांकडे हे वतन व मानपान राहिले नाहीत. ८. चारभाईप्रकरण. श्रीमंत नारायणरावसाहेब पेशवे यांची राजवटी थोडी झाली तींत पानशांनी काय कामगिरी केली त्याचा स्पष्ट उल्लेख अद्यापपर्यंत आम्हांस कोठे आढळला नाही म्हणून ती माहिती येथे दिली नाहीं. तत्रापि कोठे कोठे सधून थोडे फार उल्लेख आढळतात ते असे:-श्रीमंतांच्या वधानंतर कट कोणी व कां केला वगैरेची गुप्त चौकशी सुरू झाली. त्या वेळीं वध करणारांपैकी एक तुळ्या पवार यांची जबानी घेतली असता, त्याने