पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ पानसे घराण्याचा इतिहास. मूर्ति आनंदराव पानसे यांनी मिळविली आणि देवळांतील चंदनाचे खांब हि घेतले. या मूर्तीची स्थापना, पानशांनीं, परत आल्यानंतर आपल्या सोनोरी गांव केली. मूर्ति | चंदनी कोरीव खांब ( सहा ) कर्नाटकांतून आणल्याची गोष्ट पानसे घराण्यांत अद्यापि प्रचलित आहे व ती मूर्ति आणि पानशांनीं वांधिलेला मल्हारगड किल्ला ही श्रीमंत थोरले माधवरावसाहेब सोनोरीस आले त्यावेळी त्यांचे पाहण्यांत आली व त्यांनी ती पाहून, बहुत आनंदित होऊन देवास एक गांव इनाम देण्याचे कबूल केले. परंतु, श्रीमंत सोनोरीहून परत गेल्यानंतर थोड्याच दिवसांत निवर्तल्यामुळे गांव ( बनपुरी ) मिळावयाचा तो तसाच राहिला. मूर्ति कधी आली व तिची स्थापना कधी केली याचा नकी शक अद्यापपर्यंत आम्हांस आढळला नाहीं. तथापि, वरील सर्व बाबी लक्ष्यांत घेतल्या, म्हणजे आम्ही वर दिल्याप्रमाणे, मूर्ति मेलकोट्याहून आणली व लगेच तिची स्थापना सोनोरीस झाली असे स्पष्ट दिसते. ही मूर्ति फारच सुंदर असून, शुभ्र व अतिशय स्वच्छ अशा पाषाणाची आहे. भगवान् विष्णु हे शेषावरील गरुडावर वसले असून त्यांच्या वामांगीं लक्ष्मी आहे. भगवंताच्या चार हि हातांत, शंख, चक्र, गदा व पद्म ही त्यांची आयुधे असून चेह-यावर मंद स्मित झळकत आहे. मूर्तीची उंची साधारण मनुष्या येवढी असून, तो एक सबंध च पाषाण•आहे. श्रींच्या खर्चावद्दल, सरकारने, मौजे बनपुरी तर्फ कन्हेपठार हा गांव, पूर्वी वज्रगडाकडे सरंजामास होता तो तिकडून काढून पानशांना इनाम दिला. ( शके १६९७ फाल्गुन शुद्ध एकादशी, परिशिष्ट क्रमांक १३ पहा. ) तो अद्यापि देवस्थानाकडे चालत आहे. - या प्रसंगास कांहीं दिवस लोटल्यावर मराठी राज्यास धक्का देणारी अशी एक गोष्ट घडली, ती म्हणजे श्रीमंत थोरले माधवरावसाहेब पेशवे यांचे निधन ही होय. हैदरावरील मोहिमेचा शेवटचा निकाल लावण्यासाठी म्हणून श्रीमंत पुण्याहून शके १६९३ मध्ये निघाले, पण मध्ये च दुखणे जास्त झाल्यामुळे, ते परत पुण्यास आले. श्रीमंतांची प्रकृति गेल्या एक दीड वर्षापासून बरीच बिघडली होती व औषधोपचार सुरूच होते. शेवटीं वैद्यांनीं निदान केले की श्रीमंतांना राजयक्ष्मा झाला. तेव्हां श्रीमंतांनी आपले उपास्य दैवत जें गणपति त्याच्या पायांजवळ निरंतर राहण्यास सांपडावे, म्हणून, श्री क्षेत्र थेऊर येथे येऊन वास्तव्य केले. त्या वेळचे प्रसिद्ध वैद्य गंगा विष्णु रणछोड व रूपेश्वर बाबा यांनी या रोगावर बरेच औषधोपचार चालविले होते, परंतु, ते सर्व व्यर्थ झाले. शके १६९४ च्या श्रावणापासून प्रकृति फार बिघडली. तेव्हां तेथेच राज्यकारभाराची कामे होऊ लागली. आणि राज्यांतील निरनिराळ्या ठिकाणी असलेली विश्वासांतील मंडळी हि जमा झाली. या मंडळींत त्र्यंबकराव मामा पेठे, नाना व मोरोवा फडणीस, सखाराम बापू , रास्ते, बारामतीकर, पांच पटवर्धन, काळे, पाटणकर वगैरे व्याक्त होत्या. त्यांत च आनंदराव ( कृष्णराव ) व मलबा पानसे हे हि हजर होते. पानशांवर श्रीमंतांची मर्जी चांगली होती. श्रीमंतांनी या वेळी सरदारांना, मुत्सद्यांना इतकेच नव्हे तर कारकून, खिजमतगार यांना हि कोणास कांहीं, कोणास कांह।